Newborn Girl Found Alive in Black Bag in Bhandara | Hospital Treatment Underway | भंडारा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा: काळ्या बॅगेत फेकून दिलेली नवजात बालिका जिवंत सापडली; चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू – Maharashtra News


10 दिवसांच्या एका बालिकेला काळ्या बॅगेत रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याची भयंकर घटना भंडारा जिल्ह्यातील लाखणी परिसरात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशळ मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात ही गोंडस चिमुकली हातपाय हलवताना दिसून येत आहे. सध्या या बा

.

यासंबंधीच्या माहितीनुसार, लाखणी परिसरातील पिंपळगाव सडक येथे ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने मंगळवारी दुपारी 8 ते 10 दिवसांच्या एका जिवंत मुलीला प्लास्टिकच्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये बांधून फेकून दिले. ही बॅग रस्त्याशेजारच्या एका शेतालगत असणाऱ्या झाडाजवळ फेकून दिली होती. या बॅगेत हालचाल होत होती व तिच्यातून वासही येत होता. ही बाब रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाटसरूंच्या लक्षात आली. त्यांनी जवळपासून त्या बॅगेची पाहणी केली. त्यानंतर बॅग उघडून पाहिली असता त्यात अंदाजे 8 ते 10 दिवसांची एक नवजात बालिका आढळून आली. हे दृश्य पाहून नागरीक सुन्न झाले.

​पोलिस आणि प्रशासनाची तत्परता

या ​घटनेची माहिती मिळताच लाखणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहिले असता ती बालिका जिवंत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोणताही विलंब न लावता त्यांनी चिमुकलीला ग्रामीण रुग्णालय, लाखणी येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे हलवण्यात आले. सध्या तिच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत. ​​ वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या बालिकेची प्रकृती स्थिर आहे. मात्र, इतक्या लहान जिवाला अशा प्रकारे उघड्यावर सोडून जाणाऱ्या निर्दयी पालकांविरोधात परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत

पोलिसांच्या मते, सदर मुलीचा जन्म अनैतिक संबंधांतून झाला असावा. त्यामुळे तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. लाखणी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. स्थानिक पातळीवरही माहिती गोळा केली जात आहे. ज्या वयात बाळ आईच्या कुशीत असायला हवे, त्या वयात तिला मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

हे ही वाचा…

गौतम अदानींना बोलल्याने मिरच्या का झोंबल्या?:मनसेच्या संदीप देशपांडेंचा भाजपला सवाल; राज ठाकरेंनी अदानींवर केली होती टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका केल्यानंतर त्या भाजपला का झोंबल्या? असा खडा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आज बुधवारी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेद्वारे अदानी समूहाच्या मोदी सरकारच्या काळात झपाट्याने झालेल्या विकासावर बोट ठेवले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी भाजपला हा सवाल केला आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *