Mumbai Election Commission PADU Unit Row; Raj Thackeray Questions Commission | राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेले PADU युनिट नेमके काय?: ईव्हीएम बंद पडल्यावर PADU वापरणार; आयोगाच्या भूमिकेवर संशयाची छाया – Mumbai News


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक प्रक्रियेत नव्या यंत्राच्या समावेशामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने ‘PADU’ नावाचं नवीन मशीन आणल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावर थेट सवाल उपस्थित केला आहे. प्

.

राज ठाकरे यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी PADU मशीनच्या वापराबाबत स्पष्ट भूमिका मांडली. PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नसून, केवळ अपवादात्मक किंवा आपत्कालीन परिस्थितीतच त्याचा वापर करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. ईव्हीएम मशीन बंद पडल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास बॅकअप म्हणून हे मशीन वापरलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणताही बदल किंवा हस्तक्षेप होत नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

तरीही, PADU मशीन अचानक समोर आल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ईव्हीएमसारख्या संवेदनशील यंत्रणेशी संबंधित कोणतीही नवीन यंत्रणा वापरण्यापूर्वी राजकीय पक्षांना आणि जनतेला विश्वासात घेणं आवश्यक असतं, असं मत व्यक्त केलं जात आहे. ईव्हीएम बंद पडल्यास वापरण्यात येणारं मशीन असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी त्याची माहिती आधी का देण्यात आली नाही, हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत सविस्तर माहिती न दिल्याने संभ्रम वाढल्याचं चित्र आहे.

पर्यायी व्यवस्था म्हणून PADU युनिटचा वापर करण्यात येणार

PADU मशीन नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं, याची माहिती आता हळूहळू समोर येत आहे. PADU म्हणजे Printing Auxiliary Display Unit मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची M3A प्रकारची मतदान यंत्रणा वापरण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडणं आवश्यक असतं. मात्र काही वेळा या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडथळे येऊ शकतात. अशा वेळी पर्यायी व्यवस्था म्हणून PADU युनिटचा वापर करण्यात येणार आहे.

PADU हे स्वतंत्र मतदान यंत्र नसून, सहाय्यक यंत्र

जर कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना अडचण निर्माण झाली, तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेडने विकसित केलेल्या PADU मशीनच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच PADU हे स्वतंत्र मतदान यंत्र नसून, आधीच नोंदवलेल्या मतांची माहिती प्रदर्शित करण्यासाठी आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी वापरण्यात येणारं सहाय्यक यंत्र आहे. तरीही, नवं मशीन ही संज्ञा वापरली जात असल्याने अनेक गैरसमज पसरल्याचं दिसून येत आहे.

मुंबई महानगरपालिकेला 140 PADU मशीन प्राप्त

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला एकूण 140 PADU मशीन प्राप्त झाल्याची माहितीही समोर आली आहे. ही मशीन गरज भासल्यास वापरण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, नियमित परिस्थितीत ईव्हीएमद्वारेच मतदान आणि मतमोजणी होणार असून PADU केवळ तांत्रिक अडचणींच्या वेळीच वापरलं जाणार आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा संशयमुक्त असावा, अशी अपेक्षा राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

सविस्तर भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा

दरम्यान, PADU मशीनच्या वापरावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनावर पारदर्शकतेचा दबाव वाढला आहे. अपवादात्मक परिस्थितीसाठी असलं तरी अशा यंत्रणांची माहिती आधी देणं गरजेचं होतं, असं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे. निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आयोगाकडून याबाबत अधिक स्पष्ट आणि सविस्तर भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *