![]()
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-शिवसेना युती होणार हे अंतिम असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून युतीच्या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी युतीचे स्प
.
मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. त्यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अद्याप सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. पत्रकारांनी याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी हा प्रश्न जवळपास सुटल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस – शिंदेंत युतीवर चर्चा
बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून युतीच्या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यावर कामही सुरू झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी फार काही राहिले आहे असे मला वाटत नाही. तिढा जवळपास सुटला आहे. आमच्या जागांवर आम्ही आमचे उमेदवारही फायनल करत आहोत. ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील. पण 90 ते 95 टक्क्यांवर काहीही प्रॉब्लेम नाही.
बावनकुळे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचे, कुणाला सोबत घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांच्या अंतर्गत बाबींवर मी बोलणे योग्य नाही. त्यांनी निर्णय करायचेत. अजित पवारांचा पक्ष काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे. अकोल्यात असे घडत आहे. आमची चंद्रपूरसाठीही चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे.
भाजपची मुंबईत 13 मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. आमची रिपाइंशी चर्चा सुरू आहे. आमच्या घटक पक्षांशीही चर्चा सुरू आहे. नागपुरात जोगेंद्र कवाडेंशी चर्चा सुरू आहे. जयदीप कवाडे यांच्याशीही संवाद सुरू आहे. त्यामुळे त्या – त्या पातळीवर, त्या – त्या ठिकाणी, त्या – त्या पक्षाची क्षमता पाहून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. या पक्षांना भाजप किंवा शिंदे गटाच्या कोट्यातून जागा दिली जाईल.
शरद पवार एनडीएत येणार का?
सध्या शरद पवार एनडीएत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना तसे संकेत दिलेत. पत्रकारांनी याविषयी बावनकुळेंना छेडले असता त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. आज एनडीएचे निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार केंद्रीय भाजपला आहे. आमचे पंतप्रधान मोदी व अमित शहा व जे पी नड्डा हे याविषयी ठरवतील. पण महाराष्ट्रात आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही भाजप – सेना महायुती म्हणून लढत आहोत. नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो.
त्या – त्या स्थानिक राजकारणात काय परिस्थिती निर्माण होईल, स्थानिक पातळीवर कोणत्या युत्या होतील. आम्ही जास्त अधिकार स्थानिक लेव्हलला दिलेत. त्यानुसार त्या – त्या लेव्हलला सर्वकाही ठरत आहेत. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज्याच्या महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही.
सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत
बावनकुळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार पक्षावर नाराज नाहीत. शांत आहेत. आम्ही सर्वजण शांतपणे बसलो आहोत. मुनगंटीवार यांच्याविषयी चुकीचा गैरसमज निर्माण केला जात आहे. कारण नसताना असे केले जात आहे. ना त्यांच्या मनात तसे काही आहे, ना आमच्या मनात तसे काही आहे. मुनगंटीवर आमचे नेते आहेत. राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चंद्रपूर व विदर्भातील महापालिका लढवत आहोत. स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश होताना काही जुने कार्यकर्ते नाराज होतात. पण भाजपचा डीएनए असा आहे की, कुणी भाजपमध्ये नवे आले तर पक्ष त्याला सांभाळून घेतो.
