देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम:शरद पवारांना मागे टाकत ठरले महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री




महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ 2,430 दिवसांचा (सुमारे 6 वर्षे 7 महिने) झाला असून, त्यांचा हा कार्यकाळ अद्यापही सुरू आहे. फडणवीसांची शरद पवारांवर मात देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. 12 जुलै 2026 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे 2,430 दिवस पूर्ण केले आहेत. तर शरद पवार यांनी जुलै 1978 मध्ये वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी चार वेळा या पदाची धुरा सांभाळली. मात्र, त्यांच्या नावावर एकूण 2,412 दिवस इतका कार्यकाळ जमा आहे. विशेष म्हणजे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 असा सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले टॉप 4 मुख्यमंत्री राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे… फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचे रंजक टप्पे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम जमा होत असतानाच, सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री राहण्याचा नकोसा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. पहिला कार्यकाळ (2014 ते 2019): सलग पाच वर्षे (पूर्ण कार्यकाळ). दुसरा कार्यकाळ (2019): राज्याच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे सरकार. केवळ 6 दिवस (सुमारे 80 तास) मुख्यमंत्रिपद. तिसरा कार्यकाळ (डिसेंबर 2024 ते पुढे): सध्या सुरू असलेल्या या तिसऱ्या कार्यकाळाला 12 जुलै 2026 पर्यंत 585 दिवस पूर्ण झाले आहेत. बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील प्रवास हा सामान्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी मानला जातो. 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये गंगाधर आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी जन्म. त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस 5 वेळा आमदार होत्या, तर वडीलही आमदार होते. घरातून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (RSS) त्यांना समाजकारणाचे धडे मिळाले.अभाविपचे (ABVP) कार्यकर्ते आणि वॉर्डातील एका ‘बूथवरील कार्यकर्ता’ म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. 1992 मध्ये नागपूर विद्यापीठातून कायद्याची (LLB) पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन निवडणुकांपासूनच त्यांनी नेतृत्वगुणांना चालना दिली. 1992 ते 2001 या काळात ते सलग नगरसेवक राहिले. याच काळात त्यांना नागपूरचे महापौरपद भूषवण्याची संधीही मिळाली. आपल्या अभ्यासपूर्ण आणि संयमी नेतृत्वाच्या जोरावर एकेकाळचा बूथ कार्यकर्ता आज राज्याच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत मानाच्या तिसऱ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *