राज्यातील मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर थेट दावा करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
.
‘महायुतीत राष्ट्रवादीलाही संधी मिळावी’
मोरे यांनी म्हटले की, महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून त्यांचे केंद्रीय नेतृत्व समंजस आहे. महायुतीमध्ये पहिल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले, तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सुरू झाला. आता त्यांचाही अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी.
‘सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात’
सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चा सुरू असल्याचा उल्लेख करत मोरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे केले. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची ऐतिहासिक संधी महायुतीने साधावी, असेही त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, महायुतीच्या नेतृत्वाने जर सुनेत्रा पवार यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, तर महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श निर्माण होईल.
‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना’
डॉ. मोरे यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडेच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना पुन्हा उधाण
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत चर्चा होत असताना महायुतीतील घटक पक्षांकडूनही मुख्यमंत्रीपदाबाबत विविध भूमिका समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केलेली ही मागणी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलेली भूमिका असून, महायुती किंवा राज्य सरकारकडून मुख्यमंत्रिपदाच्या बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मागणीकडे राजकीय भूमिका म्हणूनच पाहिले जात आहे.
हेही वाचा..
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का?:14 ते 15 आमदार फुटण्याचा रामदास आठवलेंचा दावा; पुन्हा होणार ‘ऑपरेशन टायगर’

ठाकरेंची साथ सोडून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे गटातील 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
