![]()
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दि. १९ ते २८ जुलै या कालावधीत विविध धार्मिक
.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील स्वामीभक्तांसाठी महाप्रसाद, निवास, दर्शन व विविध सुविधांचे नियोजन करण्यात येत असून, उत्सवासाठी न्यास सज्ज झाला आहे.गुरुपौर्णिमेला विशेष धार्मिक विधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप, श्रीगुरुपूजन, पालखी उत्सव आणि अन्य धार्मिक विधी भक्तिभावात पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना राज्यासह देशभरातून हजारो स्वामीभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. दहा दिवस आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी होत असल्याने महाप्रसाद, स्वच्छता, निवास, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. सेवेकरी, पदाधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत असून, भाविकांना सेवा मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. उत्सवानिमित्त अन्नछत्र मंडळ परिसर, महाप्रसादालय, यात्री निवास, शामियाना मंडप तसेच अन्य इमारती रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या आहेत. अक्कलकोटमधील पालखी मार्गावर भगवे ध्वज, आकर्षक कमानी आणि कार्यक्रमांची माहिती देणारे फलक उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चालणाऱ्या या उत्सवात धर्मसंकीर्तन, कीर्तन, अभंगवाणी, भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम, व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
