Muralidhar Mohol Expresses Confidence in BJPs Ward 9 Victory | प्रभाग 9 मध्ये भाजपचा 4-0 ने विजय निश्चित: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास – Pune News


पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये मंगळवारी भाजपाची भव्य बाईक रॅली पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्या पारड्यात ४-० ने जाईल, असा विश्वास

.

रॅलीदरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात, घोषणांच्या गजरात आणि कमळाच्या जयघोषात भाजपाच्या चारही उमेदवारांचे नागरिकांनी स्वागत केले. मतदारांनी आपला कौल आधीच दिल्याचे चित्र यातून स्पष्टपणे दिसत होते.

“प्रभागातील चारही उमेदवारांना दिलेले प्रत्येक मत म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे,” असे मोहोळ म्हणाले. हे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रभागाचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास घडवण्यासाठी मैदानात उतरले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर बोलताना मोहोळ म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही व्यक्तिकेंद्री नव्हे, तर विचारकेंद्री राजकारण करणारी पार्टी आहे. भाजप विचाराने चालते, संस्कृतीने काम करते आणि निष्ठेने जनतेची सेवा करते. पक्षातील प्रत्येक उमेदवार स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या विश्वासास पात्र आहे, हाच भाजपाचा खरा बळकटीचा आधार आहे.”

या रॅलीत तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभागातील एकूण वातावरण पाहता भाजपाच्या बाजूने स्पष्ट लाट निर्माण झाली असून, ही स्थिती विरोधकांसाठी चिंताजनक ठरत आहे.

“विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपाचाच असणार हे जवळपास निश्चित आहे,” असे मोहोळ यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ९ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असून, येथील मतदार नेहमीप्रमाणे कमळालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकूणच, या रॅलीतून प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपाच्या विजयाचे ठोस संकेत मिळाले आहेत. १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्या बाजूने ४-० ने झुकणार, असा स्पष्ट राजकीय संदेश संपूर्ण शहरात गेला आहे. त्यामुळे या प्रभागाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *