Dilip Shinde & Wife Join Eknath Shinde Faction; Blow to Thackeray | मतदानाच्या 24 तास आधी ठाकरेंना महाधक्का: भाजपचा मुहूर्त हुकला, शिंदेंनी बाजी मारली; दिलीप शिंदेंचा पत्नीसह शिंदे गटात प्रवेश – Mumbai News



महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला गोरेगावमध्ये मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटाचे गोरेगाव विधानसभा संघटक आणि सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले निष्ठावान नेते दिलीप शिंदे यांच्यासह त

.

या नाट्यमय पक्षप्रवेशासाठी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिंदे दाम्पत्य सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री चक्रे फिरली आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. या प्रवेशामुळे गोरेगावमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, सत्तेच्या रणांगणात मतदानापूर्वीच उदय सामंत यांनी ठाकरे गटाला दिलेला हा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ समजला जात आहे.

शिंदे दाम्पत्य सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश करणार होते आणि मंगळवारी सकाळी 11 वाजता मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळाही निश्चित झाला होता. मात्र ऐनवेळी राजकीय सूत्रे फिरली आणि आदल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री 11 वाजता दिलीप शिंदे व प्रमिला शिंदे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश करून सर्वांना चकित केले. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी झालेल्या या अनपेक्षित घडामोडीमुळे गोरेगावमधील राजकीय गणिते कमालीची बदलली असून, यामुळे ठाकरे गटाची मोठी हानी तर शिंदे गटाच्या ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *