पुण्यात इन्फ्लुएन्सरला मनसेचा दणका, मागवली माफी:डोक्यावर चप्पल ठेवली अन् राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालायला लावले

[ads1]


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह रील बनवणे एका इन्फ्लुएंसरला चांगलेच महागात पडले आहे. महेश मोटे असे या इन्फ्लुएंसरचे नाव असून, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पुण्यात पकडून मनसे स्टाईलने ‘महाप्रसाद’ दिला आहे. त्याच्या तोंडाला काळे फासून, डोक्यावर चप्पल ठेवत त्याला उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी महेश मोटे याला चांगलाच धडा शिकवल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांनी त्याच्या चेहऱ्याला काळी शाई फासली आणि त्याला राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत (लोटांगण) घालायला लावले. एवढेच नाही, तर त्याच्या डोक्यावर चप्पल ठेवून त्याला उठाबशा काढायलाही भाग पाडले. व्हिडिओमध्ये महेश मोटे रडताना आणि हात जोडून राज ठाकरे, मनसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागताना दिसत आहे. “यापुढे अशी चूक करणार नाही, मला सोडून द्या,” अशी विनवणी तो करताना दिसत आहे. केरळहून येताच कात्रजमध्ये गाठले MNSच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष शुभम जगदाळे यांनी दावा केला की, महेश मोटे याने साधारण १५ दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. यामुळे मनसेचे कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार, मोटे गेल्या १५-२० दिवसांपासून केरळमध्ये होता. तो पुण्यात परतल्याची आणि कात्रज परिसरातील एका पार्कमध्ये असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट तिथे धडक मारून त्याला उचलले आणि मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात नेले. मनसे स्टाईल ‘महाप्रसाद’ शुभम जगदाळे यांनी या घटनेचे समर्थन करत याला ‘महाप्रसाद’ असे संबोधले आहे. “आम्ही त्याला आमच्या ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात यापुढे कोणीही अशी टिप्पणी केल्यास त्याच्याशी असाच व्यवहार केला जाईल,” असा थेट इशारा जगदाळे यांनी दिला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आणि मनसे नेत्याचे विधान समोर आले असले तरी, याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला आहे किंवा कारवाई केली आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. हेही वाचा.. गरब्यासाठी भाड्याने पार्टनर? हे खपवून घेणार नाही:’रेंट अ गरबा पार्टनर’च्या जाहिरातींवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक, कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘रेंट अ गरबा पार्टनर’ (Rent a Garba Partner) या जाहिरातींवरून संभाजी ब्रिगेड प्रचंड आक्रमक झाली आहे. गरबा डान्स करण्यासाठी १ हजार ते ५ हजार रुपयांची बोली लावून मुलींना भाड्याने देण्याचा हा गोरखधंदा पुरोगामी महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड. संतोष शिंदे यांनी दिला आहे. जे कुणी असे कार्यक्रम आयोजित करतील, ते उधळून लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *