औराळा‎:मंत्री सावे यांचे वाघचौरे कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

महाराष्ट्र

[ads1]


प्रतिनिधी | औराळा धनगरवाडी (ता. कन्नड) येथील शेतकरी रामकृष्ण शंकर वाघचौरे यांनी २२ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी वाघचौरे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी वाघचौरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलणार आहोत. महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी वाघचौरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे कटिबद्धता त्यांनी दर्शवली. या सांत्वन भेटी प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंयबाते, तालुकाध्यक्ष किशोर पवार, सुभाष काळे, जिल्हा परिषद सदस्य मंजुषा मलदुडे, विकास जिवरख, सुनील निकम, महेश मलदुडे, सुदाम पवार, पवनशेठ खंडेलवाल, गणेश पवार, विलास पवार, सचिन पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *