A rendition of the Kirtan of Habap Pankaj Maharaj Pohokar | संत गाडगेबाबा चालते-बोलते विद्यापीठ: हभप पंकज महाराज पोहोकार यांच्या कीर्तनात प्रतिपादन – Amravati News
![]()
श्री संत गाडगेबाबा हे कोणतेही अवडंबर न करता, केवळ एक गाडगे, काठी, कवडी आणि चिंध्या पांघरून समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढून खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवणारे चालते-बोलते विद्यापीठ होते, असे प्रतिपादन हभप पंकज महाराज पोहोकार यांनी त्यांच्या कीर्तन
.
यावेळी सादर झालेल्या प्रथम कीर्तनसेवेत हभप पंकज महाराज पोहोकार यांनी गाडगेबाबांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांच्या मते, आज देवालाही आदर्श माणसाची गरज आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर होणे सोपे झाले आहे, पण माणूस होणे कठीण झाले आहे. त्यांनी कविश्रेष्ठ सुरेश भट यांची ‘गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी.. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी, ही देव देवळे सारी फिरून आलो.. भिंतीपल्याड त्यांच्यात माणूस शोधतो मी’ ही कविताही सादर केली.
महाराजांच्या सांगण्यानुसार, गाडगेबाबांचे कीर्तन हे उत्तम, आदर्श आणि सुसंस्कृत माणूस घडवण्याचा कारखाना आहे. स्वच्छता, देव, धर्म, अंधश्रद्धा, रूढी आणि माणूस हे विषय त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक होते. देवधर्म व देशधर्म सांभाळा हा काळाचा इशारा आहे. त्यामुळे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे ईश्वर स्मरणच आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला वाचवू शकते, असेही पोहोकार महाराज यांनी सांगितले.
दरम्यान, गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा दुसरा दिवस पुरणपोळीने साजरा झाला. अंध, अपंग आणि निराश्रित वृद्धांना जेवण वितरित करण्यात आले. आश्रयदाते कुऱ्हे आप्पाजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अन्नदान करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त तथा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्यासह सागर देशमुख, भरतभाऊ रेडे, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, किशोर चौधरी, सुधीर धोंगडे, विठ्ठल तेलमोरे, अतुल रेडे, गजानन देशमुख आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
पुण्यतिथी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंतराव काळमेघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गाडगेबाबांच्या समाधीस्थळी भेट दिली. यावेळी सर्वांनी समाधीचे दर्शन घेतले. सर्वप्रथम हेमंतराव काळमेघ यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी चंद्रशेखर खेडकर, प्रकाश गवळी, डॉ. ए. टी. देशमुख, संदीप पुंडकर, प्रभजीतसिंह बछेर, प्रा. डॉ. स्वप्निल देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते.
