विशेष पथकाने देगलूरमध्ये 1 लाख 92 हजारांचा प्रतिबंधीत जर्दा पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकातील एका पथकाने आज देगलूर-उदगीर रस्त्यावर 1 लाख 92 हजार 200 रुपयांचे प्रतिबंधीत केलेल्या जर्दाचे 480 पुडे जप्त केले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 ऑक्टोबर रोजी विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार, पोलीस अंमलदार बालाजी पोतदार, सोनबा मुंडकर, कृष्णा तलवारे, नारायण येंगाळे, रणजित मुदीराज, अनिल वाघमारे हे देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असतांना त्यांनी देगलूर-उदगीर रस्त्यावरील छत्रपती श्री.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.25 आर.7151 ला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेल्या रत्ना जर्दाचे 480 पुडे, प्रत्येक पुड्याची किंमत 400 रुपये असा एकूण 1 लाख 92 हजार 200 रुपयांचा जर्दा जप्त केला आहे. तसेच जर्दा वाहतुक करणारी वाहतुक गाडी 6 लाख रुपयांची असा एकूण 7 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चार चाकी गाडीचा चालक मोहम्मद शरीफ अब्दुल मसजित (34) रा.इस्लामपुरा, बरकत कॉम्प्लेक्स नांदेड याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता आणि अन्नसुरक्षा मानके प्रमाणे देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 463/2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आदींनी या पथकाचे कौतुक केले आहे.
Post Views: 180