Maharashtra Mahapalika Election Final Candidate Tally 15931 Contesting 70 Unopposed | महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: 29 शहरांत 2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात; कोणत्या ठिकाणी किती उमेदवार? वाचा – Maharashtra News



राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण २,८६९ नगरसेवक पदांसाठी आता १५,९३१ उमेदवार नशीब आजमावत आह

.

राज्याची राजधानी मुंबईत २२७ जागांसाठी सर्वाधिक १,७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहरात १६५ जागांसाठी १,१६६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात तब्बल ९६८ उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उपराजधानी नागपुरात १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

माघारीचा ‘पुणे’ पॅटर्न; ८,८४० जणांची माघा

पुण्यात निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला ३३,४२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २४,७७१ अर्ज वैध ठरले, तर ८,८४० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. माघार घेण्यामध्ये पुणे (९६८) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (५५२) आणि मुंबई (४५३) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी उमेदवार (२३०) इचलकरंजी महापालिकेत आहेत.

बिनविरोध ७० जागा आणि कायदेशीर पेच

राज्यात ७० जागांवर आधीच बिनविरोध निवडी झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निवडींना न्यायालयात आव्हान देता येईल का? याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. माघारीसाठी दबाव आणला गेला हे पुराव्याने सिद्ध करणे कठीण असले, तरी निवडणूक आयोगाची भूमिका यावर निर्णायक ठरणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६: अधिकृत आकडेवारी

अ.क्र. महानगरपालिकेचे नाव प्रभाग संख्या सदस्य संख्या अंतिम उमेदवार
बृहन्मुंबई २२७ २२७ १७००
छत्रपती संभाजीनगर २९ ११५ ८५९
नवी मुंबई २८ १११ ४९९
वसई–विरार २९ ११५ ५४७
कोल्हापूर २० ८१ ३२७
कल्याण–डोंबिवली ३१ १२२ ४८९
ठाणे ३३ १३१ ६५६
उल्हासनगर २० ७८ ४३२
नाशिक ३१ १२२ ७३५
१० पुणे ४१ १६५ ११६६
११ पिंपरी–चिंचवड ३२ १२८ ६९२
१२ सोलापूर २६ १०२ ५६४
१३ अकोला २० ८० ४६९
१४ अमरावती २२ ८७ ६६१
१५ नागपूर ३८ १५१ ९९३
१६ चंद्रपूर १७ ६६ ४५१
१७ लातूर १८ ७० ३५९
१८ परभणी १६ ६५ ४११
१९ भिवंडी–निजामपूर २३ ९० ४३९
२० मालेगाव २१ ८४ ३०१
२१ पनवेल २० ७८ २५५
२२ मीरा–भाईंदर २४ ९५ ४३५
२३ नांदेड–वाघाळा २० ८१ ४९१
२४ सांगली–मिरज–कुपवाड २० ७८ ३८१
२५ जळगाव १९ ७५ ३३३
२६ धुळे १९ ७४ ३२०
२७ अहिल्यानगर १७ ६८ २८३
२८ इचलकरंजी १६ ६५ २३०
२९ जालना १६ ६५ ४५३
एकूण ८९३ २८६९ १५९३१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *