![]()
येथील “ॲसेस टू जस्टीस’ प्रकल्प व आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिनानिमित्त कान्हेरी सरप येथे जनजागृती कार्यक्रम व शासकीय योजना शिबिर घेण्यात आले.
.
गत तीन वर्षांपासून बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी घोषित केलेल्या १०० दिवसीय अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. गीतांजली विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयातून रॅलीची सुरुवात झाली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ व बेटी मेरी अभी पढेंगी, विवाह की सूली नहीं चढेंगी’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी रॅली काढली. रॅलीत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थ ॲड. मीनल खंडारे, सरपंच सुनील ठाकरे व ग्रामपंचायत अधिकारी शिवदास गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वितेसाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, पूजा पवार, पूजा मनवर, राजश्री कीर्तिवार, रवींद्र सावरकर, शैलेजा विखोरे, चाइल्ड लाइन समन्वयक हर्षाली गजभीये, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि गीतांजली शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
नि:शुल्क दिले कार्ड वंचित घटकांसाठी आयोजित कॅम्पमध्ये पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, पीएम विश्वकर्मा कार्ड, बांधकाम कामगार योजना, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड आदी कार्ड नि:शुल्क देण्यात आली.
