लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा: वडील चोरले, हिरवा साप गळ्यात घातला, संभाजीनगरच्या नामांतरावरून ठाकरे-शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी! – Chhatrapati Sambhajinagar News

शहराच्या विकासाचा आरसा दाखवणारी आणि नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ देणारी दिव्य मराठी ॲपची खास मालिका ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ प्रचंड गाजताना दिसत आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेलो. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नासेर खा

.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नासेर खान म्हणाले की, ‘आमचे मूळ मालक जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाने चोरलेत. भाजपने आम्हाला धोका दिला आहे.’ आमचे वडील यांनी चोरले आहेत. हे लोक काम करायचे नाही म्हणून गोंधळ करतात. केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये यांचीच सत्ता आहे, तरीही कामे झाली नाहीत. अजित पवार आमच्या लोकांना नगरमध्ये शिव्या देत आहेत. महायुतीमधील सर्व लोक चोर आहेत. त्यांनी आमचे वडील चोरले. ते तुमच्याशी विकासाच्या मुद्द्यावर काय बोलणार. यांचा लोकांमध्ये भांडण लावण्याचा धंदा आहे.’

विकास आणि शहराकडे कुणाचे लक्ष नाही

नासेर खान यांनी भाजपचे नगरसेवक भादवे यांना दादागिरी करू नका, खोटे पण रेटून बोलू नका, तर भाजप उमेदवाराच्या पतीला गप्प बसा, मनपाचा कर्मचारी असणाऱ्या लोकांनी भाजपचे गमछे घालून फिरू नये असे सुनावले. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमच्या शहरात पाणी नाही. तु्म्हाला कोणत्या तोंडाने सांगावे की काय करणार? सत्तेत इतके लोक आहेत की आपण पैठण सोडा मुंबईतून पाणी आणू शकलो असतो, पण विकास आणि शहराकडे कुणाचे लक्ष नाही. या लोकांनी अनेक योजनेत पैसे खाल्ल्याचा आरोप केला. यावर बोलताना भाजपचे भादवे म्हणाले की, ‘विश्वनाथ राजपूत सर्वांत पहिले कुणाचे भागीदार होते हे बघणं गरजेचे आहे. आम्ही विकास केलेला आहे आणि दुसरा विषय आमच्याकडे हिंदुत्त्व आहे. जनाब उद्धव ठाकरेंनी शहराचे नाव बदलले नाही आम्ही बदलले आहे.’ यावर बोलताना ठाकरे गटाचे पदाधिकारी म्हणाले, ‘1988 मध्ये बाळासाहेबांनी नाव बदलले आहे.’

हे काम करणार म्हणतात मी केले

भाजपच्या उमेदवार रामेश्वर भादवे म्हणाले की, ‘सर्व पक्षाचे उमेदवार हे आश्वासन देत आहेत, पण मी हे सर्व करून बसलो आहे. खोकडपुरा परिसरात मी अनेक कामे केली आहेत. खोकडपुरा परिसरातील प्रत्येक घरासमोर झाड लावले आहे. माझ्या वॉर्डात केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तसाच विकास आम्ही प्रभागात करणार आहोत. आम्ही सर्व प्रथम ड्रेनेजलाइन टाकली. मग रस्ते केले. त्यानंतर बाजूला गट्टू बसवले. रोड तापू नये म्हणून झाडे लावली. माझ्या प्रभागत सर्व रस्ते झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करत काँग्रेससोबत आघाडी केली. खैरेसाहेब यांनी हिरवा साप गळ्यात घेतला आहे. उद्धव ठाकरे आम्ही हिंदुत्त्ववादी आहे असे म्हणत होते, पण त्यांना आता जनाब म्हणायची वेळ आमच्यावर आली आहे. पाणी योजनेला उद्धव ठाकरे यांनी स्थगित दिली होती. त्यांच्या दळभद्री निर्णयामुळे शहराला पाणी मिळण्यास दोन वर्षे लेट झाले. त्यानंतर आमच्या सरकारने पाण्याची योजना पूर्ण केली. आता उन्हाळ्यापूर्वी 24 तास पाणी येणार आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झाले आहे.

परिसरात मैदाने नाही आहे ती विकसित नाही

शिवसेनेचे उमेदवार अर्जुन पेरकर म्हणाले की, ‘आमच्या प्रभागात खेळण्यासाठी मैदान नाही. जी आहेत ती विकसित केलेली नाहीत. ती विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुलांसाठी संस्कार वर्गाचे आयोजन करणार आहोत. वॉटर, गटर , मीटर आणि रस्ते हे तर नगरसेवकाचे काम आहेच. ते सोडून हे करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मी 24 बाय 7 कार्यालय सुरू करणार आहे.’

सत्तेत असणारी लोकं समस्या सांगताय

ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र दानवे म्हणाले की, ‘आमच्या प्रभागात सत्ताधारी उमेदवारच समस्या सांगत आहेत. पाणी, रस्ते, कचरा हे सर्व मुद्दे हे मांडत आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक कुणाचा आहे? शासन कुणाचे आहे, तर महायुती सरकारचे. मग तरीही हे लोकं पाण्याच्या मुद्द्यावर बोलतात. शिवसेनेचे उमेदवार यांना प्रचार कार्यालय नाहीत ते काय लोकांसाठी उपलब्ध राहतील. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अवैध प्रकारचे धंदे या भागात चालतात ते थांबवण्यासाठी प्रभागात सीसीटीव्ही लावले गेले पाहिजे. कचरा जनताच करत असते. मनपा तो स्वच्छ करत असते त्यासाठी भूमिगत कचरा कुंड्या तयार करणार आहोत. आम्ही प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरात प्रशासक सरकारचा आहे. त्यांनी सुविधा दिल्या पाहिजेत. निवडणुकीनंतर शहरातील कचरा साफ करण्याची जबाबदारी आमची राहील.

आमची सत्ता आली की सर्व समस्यांचा अंत होणार

भाजप हर्षवर्धन केनेकर म्हणाले की, ‘विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरात काही ना काही समस्या राहणारच आहेत. छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये आमची सत्ता आली की सर्व समस्यांचा अंत होणार आहे. आमच्या सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. आता आम्ही विकासाच्या दृष्टीने काम करत आहोत. आम्ही काहीच दिवसांमध्ये शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या विकासाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष आहे. आता केंद्र, राज्य आणि मनपामध्ये आमचीच सत्ता राहणार आहे.

मनपाची शाळा अतिशय खराब अवस्थेत

एमआयएमचे उमेदवार शोएब नवाब कुरेशी म्हणाले की, ‘आमच्या प्रभागातील मनपाची शाळा ही अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याकडे कोणत्याही नगरसेवकाने काम केले नाही. आम्ही शिक्षणाकडे लक्ष देत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. याच मुद्द्यारवर निवडणूक लढवणार आहोत.’

मुलांना खेळण्यासाठी मैदान असायला हवीत

शिवसेनेच्या उमेदवार सुषमा यादगिरे म्हणाल्या की, ‘आमच्या प्रभागात बऱ्याच समस्या आहेत. ड्रेनेजची लाइन तुंबलेली असते. पिण्याचे पाणी दूषित येते. काही रस्ते झालेले नाहीत. आम्ही आमच्या परिसरातील समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी पयत्न करत असतो. कचऱ्यांची समस्या असो की वृद्धासाठी सिटी बस थांबण्याची मागणी आम्ही शासन दरबारी करत असतो. आमच्या परिसरातील महिला, मुली आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर असणे गरजेचे आहे. प्रभागात विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या संपूर्ण प्रभागात मुलं-मुली उभे राहतात या ठिकाणी सीसीटीव्ही लावले पाहिजे. मुली सुरक्षित असणे फार गरजेचे आहे, तर मुलांना खेळण्यासाठी मैदान असायला हवीत.’

कुणीही कामे केलेली नाहीत

एमआयएमचे उमेदवार हाजी समीर कुरेशी म्हणाले की, ‘आमच्या प्रभागात गेली 10 ते 20 वर्षे कुणीही कामे केलेली नाहीत. आता जनता विकास करणाऱ्या लोकांना मतदान करणार आहे. या परिसरातील सिल्लेखाना, सब्जीमंडी, खोकडपुरा या भागात 10 वर्षांपासून काहीही कामे झाले नाहीत. आम्ही शिक्षणावर लक्ष देत आमच्या परिसरात आरोग्य केंद्र, मनपाची शाळा याकडे लक्ष देणार आहोत.’

‘महिलांसाठी स्वतंत्र सिटी बस असायला हवी

आपचे उमेदवार पंकज सराईकर म्हणाले की, ‘महिलांसाठी स्वतंत्र सिटी बस असायला हवी. मनपाच्या दावाखान्यात गेल्यावर नीट तपासणी झाली पाहिजे. डॉक्टर न तपासताच गोळ्या औषध लिहून देतात हे बंद झाले पाहिजे. गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी कमी खर्चात करण्यात यावी, ज्येष्ठांना आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. आज आपण शो ज्या ठिकाणी घेत आहोत त्या शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो, याकडे कुणाचेही लक्ष नाही. तर रविवारचा बाजाराच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारले गेले पाहिजे.’

कैलासनगर दादा कॉलनी परिसरात अनेक समस्या

एमआयएमचे सिराज सय्यद म्हणाले की, ‘माझ्या पत्नीला या परिसरातून तिकीट मिळालेले आहे. आमच्या कैलासनगर दादा कॉलनी परिसरात अनेक समस्या आहेत. ड्रेनेज पाणी लाईट अशी अनेक कामे झालेली नाहीत, ही कामे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रभागात शिक्षणांच्या आणि आरोग्याच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत.’

कचरा गाडी ही लोकांच्या घरापर्यंत जात नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विशाखा निल्लावार म्हणाल्या की, ‘दीड महिन्यापासून मी प्रभागात फिरत असून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. सर्वांत मोठी समस्या ही कचरा गाडी ही लोकांच्या घरापर्यंत जात नाही. आरोग्याचा विचार केला तर शासकीय आरोग्य केंद्र नाही. आमच्या प्रभागात ओपन स्पेस नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान असायला हवेत त्यामुळे मुलांचा विकास होतो. आमच्या परिसरातील शासकीय शाळाचा अवस्था खराब झाली आहे. ती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’

आमच्या प्रभागात नाल्याचा मोठा प्रश्न

भाजपच्या उमेदवार संगिता सांगळे म्हणाल्या की, ‘आमच्या प्रभागात नाल्याचा मोठा प्रश्न आहे. त्याला कठडे नाही ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तिथे टुकार मुले उभी असतात. त्यावेळी तिथून जाताना महिलांना असुरक्षित वाटते. आमच्या प्रभागात आरोग्य केंद्र नाही ते यावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. कचरा गाडी आमच्या प्रभागात सकाळी साडे पाच वाजता येते त्यावेळी अनेकांना कचरा टाकणे शक्य होत नाही. ती वेळ बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रभागात पाणी येण्याची वेळ नाही. अमर हायस्कुल परिसरातील पाणी साचत होते ते आता बंद झाले आहे.

पाण्याची वेळ निश्चित झाली पाहिजे

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मयूर सोनवणे म्हणाले की, ‘आमच्या परिसरात पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे. त्यासाठी काही वेळ निश्चित नाही. त्यापाण्याची वेळ निश्चित झाली पाहिजे. 20 ते 30 मिनिटे पाणी चांगले येत नाही. ड्रेनेजचा पाण्याचा विषय आहे. याकडे सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. बेरोजगारीचा विषय देखील महत्त्वाचा आहे. काही ज्येष्ठ नागरिकांना पाण्याचा मुद्द्यामुळे खूप त्रास होत आहे. पाण्याचा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला पाहिजे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *