![]()
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना, भारतीय जनता पक्षामध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजप यंदा नाशिकमध्ये स्वबळावर सर्व १२२ जागा लढवत आहे, मात्र ऐनवेळी ‘एबी’ फॉर्म न मिळाल्यामुळे इच्छुक उमेद
.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. फॉर्म भरण्यासाठी काही तासच शिल्लक असून, अद्याप इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाले नाहीत. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार असून, सर्व १२२ जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. मात्र, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. निष्ठावंतांचे तिकिट कापल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. नाशिकमध्ये मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली गेल्याची चर्चा रात्रीपासून सुरू होती. ज्यांना अद्याप फॉर्म मिळालेले नाहीत, असे अनेक इच्छुक उमेदवार शहराध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेण्यासाठी जमले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याऐवजी केदार यांनी गाडीतून निघून जाणे पसंत केले. यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. हा थरार नाशिक-मुंबई महामार्गावर बराच वेळ सुरू होता.
फार्महाऊसचे गेट फोडून कार्यकर्ते आत
शहराध्यक्ष आणि काही पदाधिकारी एका खाजगी फार्महाऊसवर थांबल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली. फार्महाऊसचे मुख्य गेट बंद असल्याचे पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी ते चक्क तोडून आत प्रवेश केला.
गिरीश महाजन ‘नॉट रिचेबल’
नाशिकच्या राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील सध्या ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. नाशिकमधील हा महामार्गावरील थरार आणि गाडीचा पाठलाग यामुळे भाजपची अंतर्गत एकजूट धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पक्षाला स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संभाजीनगरमध्ये सावेंच्या कार्यालयासमोर इच्छुकांचा धिंगाणा
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये अंगावर १८ केसेस ओढवून घेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ती दिव्या उल्हास मराठे यांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. भाजपचे स्थानिक नेत्यांना जाब विचारण्याचा पवित्र्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्यांना तिकीट देण्यात प्राधान्य दिल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा ‘निष्ठावान’ विरुद्ध ‘आयात’ या वादाची ठिणगी पडली आहे. सविस्तर वाचा…
