Thane Municipal Election; Eknath Shinde Setback Naresh Mhaske Son Ticket Denied | एकनाथ शिंदेंचा खासदार नरेश म्हस्केंना झटका: मुलाचे तिकीट कापले, ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; काय होणार? – Maharashtra News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारत त्यांना जोरदार झटका दिला आहे. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर नरेश म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली असून, ते आपला वेगळा निर्णय घेती
.
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांनी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली होती. ते प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक लढवणार होते. यासाठी त्यांनी या प्रभागात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली होती. तसेच प्रचारही सुरू केला होता. विशेषतः स्वतः खासदार नरेश म्हस्के यांनीही आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी जोर लावला होता. पण पक्षाने ऐनवेळी आशुतोष म्हस्के यांना तिकीट नाकारून त्यांना झटका दिला. यासंबंधीच्या माहितीनुसार, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
पण अद्याप आशुतोष म्हस्के यांना अद्याप पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाच्या समोर म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. शिंदे गटातील घराणेशाहीविरोधात मीनाक्षी शिंदे यांनी पेटवलेल्या ठिणगीमुळे नरेश म्हस्के यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे.
मुंब्र्यातील 4 माजी नगरसेवकांची शिंदे गटाला सोडचिठ्ठी
दुसरीकडे, ठाण्याच्या मुंब्रा येथील 4 माजी नगरसेवकांनी आज शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने व अन्य एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा एबी फॉर्म स्वीकारला आहे. राजन किने यांचे मुंब्रा येथे शिवसेना वाढवण्यात मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…
संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम

मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे. वाचा सविस्तर
