महाराष्ट्रात सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकीचे वातावरण झाले असून कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने
.
शिवसेना पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी ही नम्र विनंती. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा शिष्य म्हणून त्यांना अपेक्षित असा निष्ठावान 24 तास गोर गरिबांकरिता कार्य करणारा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा, अनुभवी सुशिक्षीत निष्कंलक 20 वर्ष निःस्वार्थपणे कुष्ठ रुग्णांची सेवा करणारा अशा कार्यकर्त्याची पक्षाला गरज नसल्याने शिवसेना पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी ही नम्र विनंती, अशा शब्दांत माजी सभागृह नेते, गटनेते कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
पैसा असेल तरच निवडणूक लढवण्यास पात्र
कैलास शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, साहेब सध्या देशात राज्यात जिल्ह्यात-शहरांत तसेच गावात ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे. तर हल्ली तुमच्या एकनिष्ठ असणे, किती कार्य केले, तुमचा अनुभव, शिक्षण, यांना शुन्य महत्त्व असून तुम्ही आर्थिक किती मजबूत आहात याला महत्त्व आहे. तुमच्याकडे फक्त पैसा असेल तरच तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र आहात असा अधोरेखीत नियम झाला आहे, असे शिंदे यांनी म्हटले.

आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही
पुढे कैलास शिंदे लिहितात की, त्यामुळे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि गुरुबंधू एकनाथ शिंदे साहेब यांना एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यास पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, ही नम्र विनंती. तसदी बद्दल क्षमस्व आणि आपणांस शुभेच्छा, अशा शब्दांत कैलास शिंदे यांनी आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.
