Students must emulate the ideals of great men – Ingole, program on the life journey of Babasaheb at RLT Science College | विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या आदर्शांचे अनुकरण करणे आवश्यक- इंगोले: बाबासाहेबांच्या जीवनप्रवासावर आरएलटी विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रम‎ – Akola News



‘दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी’द्वारा संचालित श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणासाठी साधने, सुविधा आणि सामाजिक स्वीकार नसतानाही डॉ. बाबासाहेबांनी केलेले अथक प

.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दि बी.जी.ई. संस्थेचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी डॉ. पवन माहेश्वरी, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. किशोर इंगोले, प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रविण कावळे, गौतम इंगोले, हर्षल बैस, अॅड. आकाश हिवराळे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांसमोर डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग उलगडून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी आढावा मांडला.

प्रास्ताविक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम इंगोले यांनी केले. मनोगत डॉ. राजेश चंद्रवंशी यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रविण कावळे, समन्वयक, समान संधी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुजाता ताडम यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. गणेश सातपुते यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शैक्षणिक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

साहित्याचे वाचन करावे : आजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोबाईल फोनच्या जादा वापराचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड. मोतीसिंह मोहता यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जास्त वेळ मोबाईलवर घालवण्याऐवजी महापुरुषांच्या जीवनावर आधारित साहित्याचे वाचन करण्यात घालवावा असे आवाहन केले.

शिक्षणाच्या बळावर झुंज समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या बळावर डॉ. बाबासाहेबांनी केलेली झुंज विद्यार्थ्यांसमोर डॉ. किशोर इंगोले यांनी उलगडून दाखवली. वर्गाच्या बाहेर बसून गणित शिकण्याची वेळ आलेल्या डॉ.बाबासाहेबांनी पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून इतिहास घडवला, असे सांगताना डॉ. इंगोले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासाठी साधने, सुविधा आणि सामाजिक स्वीकार नसतानाही डॉ.बाबासाहेबांनी केलेले अथक प्रयत्न आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांनी सिनेअभिनेत्याचे अनुकरण करण्याऐवजी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *