सत्तेसाठी काहीपण हे तुम्हीच शिकवले ना? मग लोकं सत्ताधारी पक्षासोबत येत असतील तर त्यामध्ये वाईट काय आहे. 24 सप्टेंबर 2019 ला दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलली ती पुढचे 100 वर्षे लक्षात राहणार आहे, असे
.
आदित्य ठाकरेंकडून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ऑपरेशन देवेंद्र’ म्हणत टीका करण्यात येत आहे, यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आदित्य ठाकरे हे ऑपरेशन देवेंद्र म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गतीला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ते थांबवू शकत नाही. जो नेता 50 आमदारांना घेऊन बाहेर पडू शकतो त्यांची ताकद काय असेल यावर बोलले पाहिजे. तुमची ताकद संपत आहे. दुसऱ्या कोणाच्या नावाने ऑपरेशन करण्याची काय गरज आहे? असा सवाल ही मुनगंटीवार यांनी केला आहे.

आम्ही विचार सरणीवर काम करणारे
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भाजप नेते केवळ पदाच्या मोहासाठी राजकारण करत नाहीत. “देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व जण ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना रहें’ या राष्ट्रभक्तीच्या आणि पक्षाच्या विचारसरणीचे लोक आहोत. आम्ही पदासाठी कधीच काम करत नाही. सचिन अहिरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे गटाकडून ‘बेईमानी’चे आरोप होत असताना, मुनगंटीवार यांनी थेट 2019 च्या सत्तास्थापनेची आठवण करूण दिली आहे.
‘ऑपरेशन टायगर’ नव्हे, ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’- आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज भरला. यानंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही अनेक दिवस, गेले 4 दिवस आम्ही पाहत आहोत, ज्या लोकांना सगळं काही मिळतं तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जात आहेत. यात धक्का बसण्यासारखे काही नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे आणि तिथे आमचे काम बोलते. पण एकच दुर्दैव आहे की ज्यांना आम्ही सगळे काही दिले, बरं ही एक व्यक्ती अशी आहे की आदित्य ठाकरे भेटत नाही, असं नव्हतं. परवा येताना आम्ही पुण्यातून सोबतच आलो. एवढे असूनही तुम्हाला अजून काय पाहिजे आहे, अजून किती ओरबाडणार आहात?

आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा भाजप आणि संघाच्या लोकांना सवाल आहे की, एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसवून घेतले आहे, त्यात अजून उपसभापती पदावर बसवले आहे. का नाही कोणी भाजपचा तिथे बसलेला आहे? आज इतके वर्ष घर दार सोडून भाजपसाठी काम करणारे लोक आहेत, त्यांना का नाही बसवले? हे उपरे का बसवून घेतले? हे भाजपने विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे.
