Thackeray Brothers Alliance Mumbai; BJP Vote Math Claims Zero Impact | दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते: ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने मांडले मतांचे गणित; वाचा काय आहे मतांचे समीकरण? – Maharashtra News



मनसे व ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली. यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचे गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म

.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मंगळवारी वरळी येथील एका खासगी सभागृहात मनसे व ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. तूर्त ही युती मुंबई महापालिकेसाठी झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पण भविष्यात ही युती राज्यभर होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी त्यांनी मराठी मतदारांना आपल्या युतीमागे एकसंधपणे उभे राहण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गट व मनसेच्या युतीला शून्याची उपमा दिली आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बुधवारी यासंबंधी म्हणाले की, मनसे – उबाठा युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र! किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर – उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल, रातभर थंडीने काकडून मेल…

दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. थोडं वास्तव पाहूया… फक्त मुंबईची आकडेवारी.

गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात

लोकसभेत भाजपा–सेना युती विरुद्ध उबाठा–मविआ अशी लढत होती.

भाजपने काय मांडले मतांचे गणित?

मुंबईत भाजपा, मते – 15,30,853 शिवसेना, मते – 11,43,380 महायुतीची एकत्रित मते – 26,74,233

उबाठा – 16,94,326 कॉंग्रेस – 7,68,083 मविआची एकत्रित मते – 24,62,409

विधानसभा 2025 मध्ये मनसे स्वतंत्र लढली. भाजपा – 18,90,931 शिवसेना – 10,09,083 महायुती – 29,00,020

उबाठा – 13,95,303 कॉंग्रेस – 6,82,532 मविआ – 20,77,835

मनसे – 4,10,735

आता हिशोब सरळ आहे. उबाठा + मनसे = 18,02,678

महापालिकेत उबाठा सोबत कॉंग्रेस नाही, फक्त उबाठा – मनसे युती आहे. आणि ही आकडेवारी थेट सांगते – ही मते भाजपाच्या मतांपेक्षा कमी आहेत. म्हणूनच राजकारणात लक्षात ठेवा – दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते, असे उपाध्ये यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *