Prakash Ambedkar Welcomes Raj Uddhav Alliance Sets VBA Strategy Directs Alliances Excluding BJP Guides Municipal Elections | भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा: प्रकाश आंबेडकरांच्या जिल्हाध्यक्षांना सूचना; ठाकरे बंधूंच्या युतीवरही दिली प्रतिक्रिया – Mumbai News



राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या युतीची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही आपली रणनीती स्प

.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दिशा स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, भाजप सोडून कोणासोबतही युती करा, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस बरोबर युती केली तर चालेल, अशा सूचना आंबेडकरांनी जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भाजप काही ठिकाणी त्यांच्या मित्रांबरोबर चालली आहे, तर काही ठिकाणी युती करणार नाही. कॉंग्रेस सुद्धा काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत चालली आहे, काही ठिकाणी नाही. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे. त्यामुळे एक अशी पॉलिसी नाही. ज्या महापालिका आहेत, तिथल्या अध्यक्षांना युतीसंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत. त्यांनी कोणासोबत युती करता येईल याची चाचपणी करावी. मात्र, यात एकच आहे, भाजपसोबत युती करायची नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या युतीचे स्वागत आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे. महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यानुसार आता सगळेच पक्ष कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *