![]()
नागपूरमध्ये एका २५ वर्षीय महिला पोलीस अंमलदाराची मॅट्रिमोनियल साईटवरून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर अश्लील फोटो व व्हिडीओच्या धमक्या देऊन तिच्याकडून १५ लाख ६० हजार रुपय
.
आरोपीचे नाव विकिन सूर्यभान फुलारे (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा) असे आहे. त्याने एका नामांकित विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वतःला अविवाहित वकील म्हणून सादर केले. याच खोट्या ओळखीच्या आधारे त्याने पीडित महिला पोलिसाशी संपर्क साधला. सुरुवातीला चॅटिंग आणि नंतर व्हिडीओ कॉल्सद्वारे त्याने तिचा विश्वास संपादन केला.
आरोपीने आपण लग्न करू इच्छित असल्याचे भासवून पीडितेशी भावनिक नाते निर्माण केले. ओळख दृढ झाल्यानंतर तो नागपूरला आला. २८ नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला लग्नाची मागणी घालून एका लॉजवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
यादरम्यान आरोपीने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ चोरट्या पद्धतीने काढले. त्यानंतर हे फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले. या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने फर्निचर खरेदी, वैयक्तिक अडचणी आणि इतर कारणे सांगत वेळोवेळी महिलेकडून एकूण १५ लाख ६० हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात घेतले.
जेव्हा पीडितेने लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला किन्नरांकडून जिवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
