![]()
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारातून मंगळवारी तारीख 30 एक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सेनगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात शेतातील हळद व इतर धान्य चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रथम स्थापन करून या चोरीचा छडा लावण्याचे सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिलीप मोरे, रविकिरण खंदारे, जमादार प्रेमदास चव्हाण, कोंडीबा मगरे, संदीप जाधव, नितीन गोरे, विक्रम कुंदनानी, सुभाष घुगे, साईनाथ कंटे, धनंजय क्षीरसागर, शिवाजी इंगोले व सेनगाव पोलीस ठाण्याचे रविंद्र सुरदुसे यांच्या पथकाने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावरून पोलिसांनी सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारातून ऋषिकेश टाले याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी हळदीचे कट्टे पळवल्याचे कबूल दिली. तसेच पुणे येथून चोरी केलेली एक मोटारसायकल व कागदपत्रे नसलेली आणखी एक मोटारसायकल मिळून आली. दोन्ही मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तिन्ही गुन्ह्यांतील मिळून एकूण 1,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास सेनगाव पोलिसांच्या हवाली केली आहे त्याच्याकडून चोरीची आणखी गुन्हे उघडकिस शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई:शेतकऱ्याचे हळदीचे कऱ्हे चोरणारा चोरटा गजाआड, 3 गुन्हे उघड, 1.98 लाखाचा मुद्देमाल जप्त
