[ads1] Marathi News National There Is No Support For Terrorism, Double Standards Will Not Work Rajnath Delivered Strong Words To Pakistan Deputy Prime Minister दुशांबे16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवादावरील दुटप्पी भूमिकेविरुद्ध आवाज उठवला. ते म्हणाले, ‘कोणत्याही आधारावर दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवाद्यांना पैसा, पाठिंबा किंवा सुरक्षित आश्रय देणाऱ्यांसाठी कोणतीही जागा असू नये.’ राजनाथ यांनी हे विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्या उपस्थितीत केले.एससीओच्या शासनाध्यक्षांच्या परिषदेच्या २५ व्या बैठकीत राजनाथ यांनी सदस्य देशांना दहशतवादाचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी एकत्रित पावले उचलण्याचे आवाहन केले.संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादाला शांतता आणि विकासासाठी गंभीर धोक्यांपैकी एक म्हटले. ते म्हणाले की, यामुळे समाजात कट्टरता वाढते, तरुणांच्या संधी हिरावून घेतल्या जातात व व्यापार, गुंतवणुकीचे नुकसान होते. चाबहार बंदर व आयमॅक कॉरिडॉर प. आशियाला मोठ्या बाजारपेठांशी जोडू शकतात. इराणचे उपराष्ट्राध्यक्ष व ताजिकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट राजनाथ यांनी दुशांबेमध्ये इराणचे उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद रजा आरिफ आणि ताजिकिस्तानचे पंतप्रधान कोहीर रसूलजोदा यांची भेट घेतली. या वेळी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. [ads2] What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 9 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation डेहराडूनच्या जंगलात UP मधील विद्यार्थ्याचा सांगाडा सापडला:93 दिवसांनंतर मृतदेह सापडला, स्कूटीवरून ओळख पटली, मित्रांवर हत्येचा संशय दुबळ्या मान्सूनचा परिणाम- कर्नाटकात 33% पिके उद्ध्वस्त:महाराष्ट्रात 7 दिवसांत 4 शेतकरी आत्महत्या, तामिळनाडूत तांदळाचे दर 50% वाढले