आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत खरेदीचा उत्साह होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला दुचाकी, चारचाकी, मोबाइल, दूरचित्रवाणी, फ्रिज, वॉशिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सदनिका, घरे खरेदीला लोकांनी प्राधान्य दिले. यंदा वाहन बाजारात चांगली तेजी आहे. दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सिल्लोडला ६५ ट्रॅक्टर, पैठणला २०, फुलंब्री १० व इतर तालुक्यांत २५ असे १२० ट्रॅक्टरची विक्री झाली. तसेच दुचाकीची १५०० च्यावर विक्री झाली आहे. दसऱ्याला नवीन वाहन घरी आणणे शुभ मानले जात असल्याने दुचाकींपासून चारचाकींपर्यंतच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून तयारी केली जात आहे. या दिवशी नवीन वस्तू, सोने-चांदी आणि वाहन खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. अनेक ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनाची पूजा केली. पैठण | आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पैठणच्या वाहन बाजारपेठेत तेजी पाहायला मिळाली. तब्बल २० हून अधिक ट्रॅक्टर, १०० हून अधिक टू व्हिलर, तर ५० चारचाकीची विक्री झाली असे वाहन विक्रेते अमोल कुलकर्णी यांनी सांगितले. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन वस्तू, सोने-चांदी आणि वाहन खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. सराफा, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंच्या विक्रेत्यांनाही तेजी पाहिला मिळाली. सराफा गोपाल वर्मा यांनी सांगितले की, सोन्या-चांदीच्या खरेदीत एक कोटीची उलाढाल होत आहे. यावर्षी सणाचा किराणा खरेदीत ऐंशी लाखांची उलाढाल झाली आहे. वैजापूर | वैजापूर तालुक्यात सुमारे साडेपाच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात दुचाकी, चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली आहे. गंगापूर | आज दसऱ्याच्या मुहूर्तावर गंगापूर शहरात सोने-चांदीचे भाव कमी झाल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसून आला. मात्र मोबाइल, इलेक्ट्रॉनिक, रिअल इस्टेट व इतर क्षेत्रातही खरेदी झाली. पैठणला २० हून अधिक ट्रॅक्टर विक्री गंगापुरात सोने खरेदीत ग्राहकांचा उत्साह कन्नड तालुक्यात सोने आणि चांदीचे मोठी खरेदी What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 11 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation महाराष्ट्रातील दुष्काळ समस्येवर पुण्यात राज्यस्तरीय बैठक:एस एम जोशी फाउंडेशनने 21ऑक्टोबरला बोलावली, पुढील दिशा ठरणार रासपचा घोड्यावरून शेतपाहणी दौरा; शासनाच्या तुटपुंज्या मदतीचा निषेध:राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून गळ्यात भोपळा अडकवून आंदोलन