![]()
लग्नात घोडा लावला नाही, तसेच वऱ्हाडींना फेटे दिले नाही, आता फ्लॅट घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सासरच्या सहा जणांवर शनिवारी ता. 13 औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील कोंडशी येथील माधुरी यांचा विवाह परभणी जिल्ह्यातील आळंद येथील गजानन सांगडे याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. तुझ्या कुटुंबियांना लग्नामध्ये घोडा लावला नाही तसेच वऱ्हाडी ्मंडळींनी फेटे दिले नाही या कारणावरून त्यांचा छळ केला जाऊ लागला होता. त्यांनतर फ्लॅट घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून त्यांना त्रास दिला जाऊ लागला होता.
दऱम्यान, सासरी होणारा छळ असह्य झाल्याने माधुरी ह्या माहेरी कोंडशी येथे राहण्यासाठी आल्या. त्यानंतर सासरची मंडळीही त्यांच्या माहेरी आली त्यांनी माधुरी यांना मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी माधुरी यांचे आई, वडिल मधे पडले असता त्यांच्या आई, वडिलांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांचाकडून होणारा छळ असह्य झाल्याने माधुरी यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गजानन सांगडे, किसन सांगडे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सिद्दीकी पुढील तपास करीत आहेत.
