![]()
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काही घडामोडी घडतील असे काही वातावरण नाही, भाजप आणि शिवसेना एकसंघ आहे. 332 लोकांचे बहुमत आपल्याकडे आहे. शरद पवार असतानाच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकत होता आता तसे चित्र नाही. 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
.
संजय गायकवाड म्हणाले की, वेगळ्या विदर्भाचे आम्ही कधीच समर्थन करत नाही. आमची भूमिका ही अखंड महाराष्ट्राची आहे. मला नाही वाटत भविष्यातही वेगळा विदर्भ होईल. कारण विदर्भ जर वेगळा झाला तर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री थोडा होता येईल? त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर नुसत्या विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून काय मिळणार असा सवाल गायकवाड यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस वेगळ्या विदर्भाच्या दिशेने काही पाऊल टाकतील असे मला वाटत नाही.
उठावाचा निर्णय अमित शहांशी चर्चा करत
संजय गायकवाड म्हणाले की, शिवसेनेमध्ये जेव्हा उठाव झाला तो अमित शहा यांच्यासोबत चर्चा करुण झाला आहे. त्यामुळे शहा हे एकनाथ शिंदे यांचा आदर करतात आणि त्यांनी मो केलाच पाहिजे. वापरायचे आणि फेकून द्यायची शहांची भूमिका वाटत नाही, ज्यांना वाटते खिशात घातले तो त्यांचा दृष्टीकोन आहे असे म्हणत प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
उद्यापासून मनपासाठी काम सुरू
संजय गायकवाड म्हणाले की, महायुतीमधील सर्व पक्ष उद्यापासून मनपा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर येणार आहे. आमच्याकडे आमच्या पक्षाकडून सर्व जबाबदाऱ्या फिक्स करण्यात आल्या आहेत. आचार संहिता उद्याच लागण्याची शक्यता आहे. मनपाची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार आहे. आम्ही तर तयारीला लागलो आहोत आता विरोधीपक्ष मैदानात उतरण्याची आम्ही वाट पाहात आहोत.
अधिवेशातून शेतकऱ्यांना दिलासा
संजय गायकवाड म्हणाले की, अधिवेशामध्ये शेतकऱ्यां संदर्भात बऱ्यांपैकी विधेयक महसूल विभागाबरोबर पास झाली आहे. ज्या कायद्यामुळे शेतकरी भरडला जात होता आता त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. महसूल विभाग आणि शेतकऱ्यांसाठी विधेयकं या अधिवेशनात पास झाली आहेत.
