![]()
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बद
.
विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली,यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं असा आक्रमक पवित्रा वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतला.
यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले.
शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील भाकड जनावरांबाबत प्रश्न उपस्थित केले. गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते ऐकले नाही तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकऱ्याला इतकी मारहाण केली की त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकऱ्यांना काही पैसे तरी मिळतात. पण आता या बोगस टोळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे,ही वसुली थांबवली पाहिजे.
वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरफायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शेतकरी संघटनेकडून तक्रारी देखील आल्या आहेत. शेतकरी जनावरांची वाहतूक करताना अडवणूक झाली तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाज्योती राबवण्याऱ्या परीक्षेचे प्रशिक्षण ऑफलाईन करावे
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्याने त्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी काल आंदोलन देखील केले. यावर्षी महाज्योतीला जो निधी दिला आहे तो कमी आहे.. लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा तसेच महाज्योतीचे गेल्यावर्षीचा निधी देखील प्रलंबित आहे. तो ही देण्यात यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षणाची मागणी असेल तर ऑफलाईन ही देण्यात येईल हे स्पष्ट केले. निधी कमी दिला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या विभागाला कमी निधी देण्यात आला आहे याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली आहे, मार्च मधील पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले.
