शेतकऱ्यांना 50 तर मजुरांना 25 हजारांची मदत द्या:पंचनामे सुरू होताच रोहित पवारांची सरकारकडे आक्रमक मागणी

[ads1]


राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या तारखेला कडाडून विरोध झाल्यानंतर आता सरकारने तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले असून, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचे आभार मानतानाच त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे आणि मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला गंभीर इशाराही दिला आहे. “5 ऑक्टोबरचं खूळ सरकारच्या डोक्यात भरवलं होतं” रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सरकारवर आणि प्रशासनावर निशाणा साधला. “५ ऑक्टोबर नंतर दुष्काळाचे पंचनामे करण्याचा आणि NDRF मदतीचा काहीही संबंध नाही, हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. पण काही कटकारस्थानी आणि शेतकरी विरोधी मानसिकतेच्या अधिकाऱ्यांनी आणि सल्लागारांनी 5 ऑक्टोबरचं खूळ मुख्यमंत्री साहेबांच्या डोक्यात भरवलं होतं,” असा आरोप त्यांनी केला. दौऱ्यांचा आणि पत्राचा परिणाम सरकारने आपला निर्णय बदलण्यामागे विरोधक आणि शेतकऱ्यांचा दबाव असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. “शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका, आदरणीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र, मीडियाने लावून धरलेली शेतकऱ्यांची बाजू आणि आम्ही केलेले दुष्काळी पाहणी दौरे यांचा परिणाम आता दिसत आहे. 5 ऑक्टोबरचं हे खूळ काढून पंचनाम्यांना आजपासून सुरुवात केली जातेय, याबाबत मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो,” असे पवार म्हणाले. 75 हजार कोटींचे नुकसान; मदतीसाठी सरकारला भाग पाडू! पंचनामे सुरू झाले असले तरी मदतीच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. राज्याला दुष्काळाचा मोठा फटका बसला असून, साधारणतः ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. “शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत मिळावी, या मागण्यांवर सरकार सध्या गंभीर दिसत नसले तरी ही वस्तुस्थिती आहे. या मागण्या मान्य करण्यास आम्ही सरकारला भाग पाडूच!” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. हेही वाचा.. शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना: केंद्राआधी राज्य सरकारच तिजोरी उघडणार, बळीराजाला मदतीची तयारी सुरू, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय एल निनोमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात २२ सप्टेंबरपर्यंत २०८ मिमी कमी पाऊस झाला. परिणामी दुष्काळाची तीव्रता वाढली. म्हणून केंद्राआधी महायुती सरकारच बळीराजासाठी तिजोरी उघडणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल. सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *