[ads1]
- Marathi News
- National
- Bihar Student’s Molestation Main Accused Arrested After Encounter, 5 Accused In Custody So Far
पाटणा9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

बिहारमधील जमुई येथे १९ सप्टेंबर रोजी दहावीतील विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रावर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदन यादव याला चकमकीनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत नंदनच्या पायात गोळी लागली, तर त्याचा साथीदार हरेराम यादव पळून जाण्याच्या प्रयत्नात गुडघ्याला मार लागल्याने जखमी झाला. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना पकडण्यात आले आहे. यापूर्वी ताब्यात घेतलेल्या तीन अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर (जुवेनाइल जस्टिस बोर्ड) हजर केले जाईल. दोन्ही मुख्य आरोपींच्या चौकशीनंतर आणखी काही जणांना अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पप्पू यादवांचा आरोप, आरोपी भाजप संबंधित
पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी या प्रकरणावरून बिहार सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘आरोपी भाजपशी संबंधित असून सरकार ही बाब लपवत आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी जमुईतील घटनेवरून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘बिहारमधील कायदा व सुव्यवस्था कोलमडली असून यामुळे राज्य शरमेने मान खाली घालण्यासारखी स्थिती निर्माण झाली,’ असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि जदयूचे ज्येष्ठ नेते राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह म्हणाले, ‘गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, हा संदेश गेला आहे.
फास्ट ट्रॅक ट्रायलची तयारी
आरोपींविरुद्ध लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी आहे.
[ads2]
















Leave a Reply