[ads1]
![]()
शाळापूर्व शिक्षणाबाबत पालक व समाजात जनजागृती होण्यासाठी ठेंगोडा येथील आराईरोड अंगणवाडी केंद्रात पोषण सेवा सप्ताह अभियान निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रयवेक्षिका पी. एच. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सरपंच भारती वाघ, उपसरपंच नारायण निकम, माजी सरपंच शांताराम वाघ, सीएचओ प्रियांका पवार, आरोग्यसेवक भरत जाधव, मानसी पवार आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी केंद्रात विविध कडधान्ये, भाज्या, पालेभाज्या, पोषक आहार, फळे, दूध, अंडी व गरोदर मातांसाठी पोषण ताटाचे तसेच माता व बालकांच्या आरोग्यासाठी संतुलित आहाराचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांमधून बालकांसाठी पौष्टिक आहार कसा करावा व संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत अंगणवाडी सेविका गायत्री देसले यांनी माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सीएचओ प्रियांका पवार यांनी ॲनिमियाबाबत सांगत रक्तक्षय टाळण्यासाठी योग्य आहार, आरोग्य तपासणी, स्वच्छता व माता-बाल संगोपनाबाबत मार्गदर्शन केले. बालकांचे पोषण, आरोग्य, स्वच्छता, माता-बाल संगोपन आणि शाळापूर्व शिक्षणाबाबत पालक व समाजामध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी अंगणवाडीतील शाळापूर्व शिक्षण किटचे प्रदर्शन झाले. खेळाद्वारे बालकांचा बौद्धिक, भाषिक, सामाजिक व भावनिक विकास घडत असल्याने शाळापूर्व शिक्षणाच्या विशेष महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात आली. मदतनीस अर्चना भामरे, आरोग्य सेविका, आशा वर्कर, माता-पालक, गरोदर माता, स्तनदा माता व किशोरी मुली उपस्थित होत्या.
[ads2]
ठेंगोड्यात सेवा सप्ताह अभियानांतर्गत अंगणवाडी उत्सव:माता-पालकांसह गरोदरव स्तनदा मातांचा सहभाग
















Leave a Reply