[ads1]
![]()
अमरावती येथे सिंधी कुटुंबांना त्यांच्या निवासी जमिनीची मालकी देण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ५८५ नागरिकांना जमिनीचे पट्टे वाटण्यात आले. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यावर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. त्यामुळे सिंधी बांधवांनी भारतात स्थलांतर केले. त्यांना आपले नातेवाईक, घरदार, जमीन आणि व्यवसाय सोडून यावे लागले. भारतात आल्यानंतरही अनेक वर्षे त्यांना निर्वासितांसारखे जगावे लागले. अमरावती शहरात राहणाऱ्या ५८५ सिंधी कुटुंबप्रमुखांना ७७ वर्षांनंतर निवासी वापरासाठी कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे मिळाले. यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, सिंधी समाजाने भारताच्या आर्थिक प्रगतीत आणि अमरावती जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कापड उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या समाजाला हक्काचे घर मिळावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. राज्याचा महसूलमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे. हा कार्यक्रम येथील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत साई डॉ. संतोष नवलानी महाराज, महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, भाजपचे पदाधिकारी जयंत डेहनकर, किरण पातूरकर, रविराज देशमुख, चेतन गावंडे, विरेंद्र कुकरेजा, कन्हैयालाल रंगवानी, डॉ. इंदरलाल गेमनानी, वासुदेव क्रिशवानी, सुनील खराटे, ॲड. प्रशांत देशपांडे, डॉ. संजय तिरथकर, रवींद्र खांडेकर आणि सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[ads2]
77 वर्षांनंतर 585 सिंधी कुटुंबांना मिळाली हक्काची जमीन:अमरावतीत पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पट्ट्यांचे वाटप
















Leave a Reply