नांदेड : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
शासकीय व निमशासकीय मालमत्तेवरील राजकीय बॅनर, पोस्टर्स व फलक २४ तासांत हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन शासकीय योजना किंवा कामांना मंजुरी, राजकीय कार्यक्रमांसाठी शासकीय वाहनांचा वापर आणि निवडणूक कामातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर निर्बंध राहणार आहेत.
२२ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आचारसंहिता लागू असून, उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
















Leave a Reply