पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा:रीलस्टार संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक, व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप

[ads1]


पुण्यातील रीलस्टार आणि यू-ट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पंडित यांच्या राहत्या घराबाहेर चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पंडित हे ‘संतोष पंडित 6278’ या त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवरून पुणे महानगरपालिकेची विकासकामे, त्यातील त्रुटी आणि लोकप्रतिनिधींवर सातत्याने व्हिडिओच्या माध्यमातून टीका करत असतात. मात्र, अलीकडेच त्यांनी कोथरूडमधील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मंत्री चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याविरोधात अत्यंत असभ्य, आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर करत व्हिडिओ पोस्ट केला होता. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल याप्रकरणी सारिका कांबळे या महिलेच्या तक्रारीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1.28 वाजता नोंदवलेल्या या गुन्ह्यात (गुन्हा क्र. 0361/2026) भारतीय न्याय संहितेच्या कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम 67 अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. याआधी भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनीही या बदनामीकारक व्हिडिओंविरोधात तक्रार दिली होती. मध्यरात्री कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर कोथरूड व डेक्कन पोलिसांच्या पथकाने तातडीने पावले उचलत बुधवारी मध्यरात्री सुमारे 1 वाजता संतोष पंडित यांच्या निवासस्थानी धडक दिली. दोन गाड्यांमधून आलेल्या पोलिसांपैकी काही कर्मचारी साध्या वेशात होते. पोलिसांनी ताब्यात घेताना पंडित यांच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सुरू केले. गाडीत बसताना पंडित यांनी, माझ्याकडून त्रास झाला असल्यास माफी मागतो, अटक केल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत पोलिसांना सहकार्य केले. तसेच आपला मोबाईल, गाडीची किल्ली आणि कमरेचा पट्टा काढून कुटुंबीयांकडे सोपवला. हे ही वृत्त वाचा

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस:बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’ आंतरवाली सराटी39 मिनिटांपूर्वी

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वाचा सविस्तर

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *