Vijay Wadettiwar Slams Maharashtra Govt Over Drought Relief Funds

[ads1]

राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व कामे बाजूला ठेवून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःची तिजोरी खुली करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट

.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील लोकप्रतिनिधींनी आपल्या वाढदिवसांचे भव्य सोहळे टाळले पाहिजेत. मुलांचे वाढदिवस दरवर्षी साजरे करता येतात. जर सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव नसेल, तर त्यांनी मदतीचा दिखावा करू नये. केंद्र सरकार गुजरातला मोठे आर्थिक पॅकेज देते आणि महाराष्ट्रात मात्र केवळ मते मागण्यासाठी येते. मदत जाहीर करताना महाराष्ट्राच्या पदरात अतिशय तोकडी मदत पाडली जाते.

पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे अश्रू केवळ मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर सुकतील अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. सरकारने तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात आणि फळबागांच्या नुकसानीसाठी मोठी मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण केले पाहिजेत.

मागच्या वर्षीच्या 31 हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले?

विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या वर्षी 25 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी 31 हजार 600 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यावेळी 29 जिल्हे बाधित झाले होते. मात्र, वेगवेगळे नियम लावून प्रत्यक्षात केवळ 15 हजार कोटी रुपये (म्हणजेच फक्त 49 टक्के) देण्यात आले. केवळ आकडा मोठा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली; त्या पॅकेजच्या उर्वरित पैशांचे काय झाले? असा सवाल त्यांनी विचारला.

विशेष अधिवेशनाची मागणी

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तात्काळ तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. एवढे मोठे संकट असताना ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणे योग्य नाही. सरकारने विरोधकांना विश्वासात घेऊन सविस्तर चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना ठोस मदत जाहीर करावी.

हे ही वृत्त वाचा

अमित शहांचे 370 हटवण्यापासून नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यापर्यंत काम स्पष्ट:दिशा सालियान प्रकरण समोर येताच आदित्य ठाकरे कुठे गायब झाले, हे संजय राऊतांनी सांगावे- नवनाथ बन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी करणारे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेनेच निवडणुकीत बडतर्फ करून घरी बसवले आहे, असा पलटवार भाजप नेते नवनाथ बन यांनी केला आहे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांनी निवडून दिले असून, हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *