उत्तराखंडमध्ये भूस्खलन, हायवे बंद; छत्तीसगडमध्ये पूल कोसळला:UPच्या रस्त्यांवर बोटी, बिहार-झारखंडमध्ये वीज कोसळून 10 ठार




उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रुद्रप्रयागमध्येही सततच्या पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे बिलासपूर-रतनपूर-पेंद्र्रा मार्गावरील एक पूल मधूनच तुटला; यावेळी पुलावरून जाणारी एक प्रवासी बस मधल्या भागातच अडकून पडली. डोंगराळ भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील गंगा, घाघरा आणि शारदा यांसह दहा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बिजनौरमध्ये गंगेचे पाणी सहा गावांमध्ये शिरल्याने रस्त्यांवरून बोटी चालवण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, रविवारी बिहारचा बांका जिल्हा आणि झारखंडमधील विविध ठिकाणी वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाला. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा देशभरातील हवामानाचे फोटो…
देशभरातील हवामानाची माहिती घेण्यासाठी, खालील ‘लाइव्ह ब्लॉग’ पहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *