![]()
अमरावती येथे बालरंगभूमी परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित हा कार्यक्रम हव्याप्र. मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात बाल नाट्य दिनी उत्साहात पार पडला. या महोत्सवात बालकलावंतांनी अहिल्यादेवींच्या शौर्य, शैक्षणिक उपक्रम, पराक्रम आणि सामाजिक कार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत व नाटुकल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्याम देशमुख यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. रंगकर्मी मनोज सामदेकर, बालरंगभूमीच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष मंगेश बक्षी, तसेच परीक्षक अजित वडवेकर व निलीमाताई लोडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सादरीकरणानंतर परीक्षकांच्या हस्ते गुणवंत कलावंतांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. विशाल तराळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर भूषण उंबरकर यांनी आभार मानले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संजिवनी पुरोहित, स्वाती तराळ, स्नेहा तराळ, अद्वैत तराळ आणि सतीश जयस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राथमिक फेरीतून उत्कृष्ट सादरीकरण करत एकल गटात सायली जुमडे आणि समूह गटात नारायणदास लढ्ढा हायस्कूलची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. हे विजेते ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी अहिल्यानगर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत अमरावतीचे प्रतिनिधित्व करतील.
बालरंगभूमी स्पर्धेत सायली जुमडे, नारायणदास हायस्कूलची निवड:अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरण, 9 ऑगस्टला अंतिम फेरी
