नांदेड– ब्राझील पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2026 चे आयोजन दि.27 जुलै, 2026 ते 01 ऑगष्ट,2026 या कालावधीत सावो पाऊलो, ब्राझील या देशात संपन्न झालेल्या स्पर्धेत भारताकडुन महाराष्ट्र राज्याचे कु. यशोधन विजयकुमार रावणकोळे यांनी बॅडमिंटन पुरुष एकेरी या गटामध्ये भारत विरुद्ध ब्राझीलच्या सामन्यात सरळ सेट मध्ये 24-22 व 21-11 फरकाने हरवून स्वर्णपदक जिंकले आहे. तसेच पुरुष दुहेरी मध्ये भारत विरुद्ध पेरू या सामन्यात 21-09 व 21-10 फरकाने हरवून स्वर्णपदक जिंकले आहे. तसेच मिश्र दुहेरी या गटामध्ये मध्ये भारत विरुद्ध पेरूच्या सामन्यात 22-20, 17-21 व 21-12 अशी शेवट पर्यंत कडक झुंज देऊन कांस्य पदक पटकावले आहे. ही बाब अभिमानास्पद असुन त्यामुळे आपल्या देशांचे, राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव लौकीक केले आहे.सदयस्थितीत ते भारतीय खेल प्राधिकरण (साई) गांधीनगर (गुजरात) येथे प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत.
कु. यशोधन विजयकुमार रावणकोळे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मा. श्री. राहूल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड), मा.श्री. डी.पी.सावंत, माजी पालकमंत्री, नांदेड जिल्हा तथा अध्यक्ष, जिल्हा बॅडमिंटन असो. नांदेड, मा. श्री. भैरवनाथ नाईकवाडी (जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड), मा.श्री. बद्री नारायण (मुख्य प्रशिक्षक, गांधीनगर), श्री. विजय काकडे (तालुका क्रीडा अधिकारी), श्री. जयप्रकाश तपघाले (तालुका क्रीडा अधिकारी,लोहा) श्री. संजय बेतीवार (क्रीडा अधिकारी), (राज्य क्रीडा मार्गदर्शक) श्री. बालाजी शिरसीकर, श्री. सी.आर.होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी श्री.राहुल श्रीरामवार, श्री. विपूल दापके, कनिष्ठ लिपीक श्री. दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, त्यांचे प्रशिक्षक श्री. चेतन माने, श्री. किरण माने, डॉ. महेश वाकरडकर, यांच्यासह अनेकानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच कु. यशोधन यांच्या यशामागे त्यांचे आई-वडील श्री. विजय रावणकोळे व श्रीमती वर्षा रावणकोळे यांचा मोठा वाटा आहे.
Post Views: 197
