शेख जाकीर शेख सगीरने जातीचे प्रमाणपत्र बनवून दिले आणि आम्हाला फसवले 


निवडून आलो पण सर्टिफिकेट कुठून आले? हमको नही मालूम! : नांदेडच्या राजकारणात एजंटगिरी सुळसुळाट

नांदेड (प्रतिनिधी) –  राजकारण हे सामान्यांच्या बुद्धीपलीकडचे असते असे म्हणतात, पण नांदेडच्या प्रभाग क्रमांक ०२ चैतन्य नगरमध्ये तर चक्क विस्मरण आणि एजंट शक्तीचा चमत्कार पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर १५०० मते घेऊन नगरसेविका बनलेल्या अफिया नाज यांना त्यांच्या स्वतःच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल विचारले असता, त्यांनी दिलेले उत्तर ऐकून पोलीसही चक्रावून गेले असतील हमको नही मालूम!

एजंटचे जादूई दिवे! नगरसेविका महोदयांच्या मते, त्यांनी कागदपत्रे पतीराजांकडे सोपवली होती. पतीदेव काजी नाफेउद्दीन सिद्दीकी यांनी आपली व्यापारी बुद्धी वापरून ती कागदपत्रे शेख झाकीर शेख सागीर नावाच्या अल्लाउद्दीनच्या चिरागा सारख्या  एजंटच्या  हवाली केली. आता या एजंट ने  त्या कागदपत्रांचे काय केले, कोणते नवीन मसाले लावून प्रमाणपत्र बनवले, हे या दाम्पत्याला माहीतच नाही.

फसवणूक की सोयीस्कर विस्मरण? आम्हाला फक्त प्रमाणपत्र हवे होते, एजंटने आम्हाला फसवलं, असा सूर आता पतीराजांनी लावला आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या जीवावर वॉर्डाचा कारभार चालतो, त्यांना स्वतःच्या निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कुठून आली, हे शोधण्यासाठी पोलिसांकडे न्याय मागावा लागत आहे. एजंटने कुठून डॉक्युमेंट आणले मला माहीत नाही, असे म्हणत नगरसेविकेच्या पतीने हात झटकले आहेत.

थोडक्यात पण महत्त्वाचे:

  • प्रभाग: ०२, चैतन्य नगर, नांदेड.
  • नगरसेविका: अफिया नाज (ज्यांना प्रमाणपत्राचा पत्ता नाही).
  • मुख्य सूत्रधार (दावा): शेख झाकीर आणि शेख सागीर (एजंट्स).
  • पतीची भूमिका: मैने डॉक्युमेंट एजंट को दिये थे, उसने मुझे फसाया.

एकूणच काय, तर १५०० लोकांनी मतदान करून नगरसेविका निवडून दिली, पण त्या नगरसेविकेचे प्रमाणपत्र कोणत्या लॅबमध्ये तयार झाले, हे शोधण्याचे काम आता पोलिसांना करावे लागत आहे. लोकशाहीच्या या अजब कारभारात, नेते फक्त निवडून येण्याचे काम करतात, कागदपत्रांचे सेटिंग करायला तर एजंट बसलेच आहेत!  गुन्ह्याचा तपास इतवारा पोईस ठाण्यातील जबरदस्त पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *