खासदार पप्पू यादव यांच्यावर झालेल्या कथित चाकूहल्ल्याच्या प्रयत्नानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात केवळ हल्लेखोर नव्हे, तर त्यामागील सूत्रधारालाही समोर
.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, संसदेसमोर भगवान श्रीराम मंदिरातील कथित चंदा चोरीचा देखावा सादर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांची देशभर बदनामी झाल्याचा दावा केला. याच पार्श्वभूमीवर खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मास्टरमाईंडलाही कायद्याच्या कचाट्यात आणावे
पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, हल्ला करणाऱ्यांसोबतच त्यामागील कथित मास्टरमाईंडलाही कायद्याच्या कचाट्यात आणावे, असे म्हटले आहे. तसेच या घटनेत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
‘दिल्ली पोलिस निष्पक्ष चौकशी करतील का?’
दिल्ली पोलिसांवरही रोहित पवार यांनी निशाणा साधला. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा उल्लेख करत त्यांनी, “सत्ताधाऱ्यांचे गुलाम बनून काम करणारे दिल्ली पोलीस या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करतील का, हा मोठा प्रश्न आहे,” अशी टीका केली. या प्रकरणी संबंधित सर्व बाबींची पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमधून केली.
दानपेटी चोरीला संघाचे समर्थन का?- संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, दान चोरीविरोधात आंदोलन करणे हे सुद्धा असंवैधानिक आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. पप्पू यादव यांच्यावरील हल्ल्यावर बोलताना राऊतांनी असे म्हटले आहे. राम मंदिरात 1400 कोटी रुपयांची चोरी होते आणि आवाज उठवणाऱ्यांवर हल्ला केला जातो त्यांचे संघ संमर्थन करतो म्हणजे दान पेटी चोरीला संघाचे समर्थन आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा..
पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले: मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल

आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. सविस्तर वाचा
