![]()
ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपवर खाद्यपदार्थ स्वस्त मिळतात असा समज आहे. प्रत्यक्ष रेस्टॉरंटपेक्षाही 27 ते 38 टक्क्यांचा खवय्यांना भुर्दंड बसतो. छत्रपती संभाजीनगरच्या 5 रेस्टॉरंटमध्ये जर बिर्याणीचा आस्वाद घेतला तर फूड डिलिव्हरी ॲपपेक्षा 60 ते 110 रुपयांपर्यंत बिल कमी येते. शाकाहारीचे दरही हॉटेलात स्वस्तच असतात. जीएसटीसह सर्व्हिस चार्ज देऊनही एकूण बिलावर 38 टक्क्यांपर्यंतची बचत होते. ‘दिव्य मराठी’ने व्हेज आणि नॉन व्हेजेच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन रेटची पडताळणी केली तेव्हा ॲप्सच्या कमाईचे गौडबंगाल समोर आले. ‘अमिगोज किचन’मध्ये 300 रुपयांची चिकन बिर्याणी आपल्यापर्यंत येता-येता 384 रुपयांची होते. म्हणजे 84 रुपयांचा भुर्दंड बसतो. याल्ला-याल्लाला 339 रुपयांची स्पेशल बिर्याणी ऑनलाइन घेतल्यास 416 रुपयांना मिळते. भडकल गेटच्या सागरला 310 रुपयांना मिळते. त्याच बिर्याणीला ऑनलाइनवर 70 रुपये अधिक लागतात. मिल कॉर्नरच्या सिल्व्हर स्पूनमध्ये 290 पेक्षा कमी लागतात. पण ॲपवर 353 लागतात. मुस्तफाच्या बिर्याणीला स्पॉटवर 300 तर ऑनलाइनवर 385 रुपये लागतात. ‘लोकल सर्किल्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणाचेही असेच निष्कर्ष आले आहेत.
49 % ग्राहक नाराज मूळ किमतीवर 70 ते 159 रुपये अधिकचे लागतात 1. रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी : 310 रु.
मूळ किंमत : 280 रुपये
जीएसटी : 13 रुपये
सर्व्हिस चार्ज : 12 रुपये
इतर चार्जेस : 05 रुपये सिडको, कॅनॉट सेंटरजवळील ‘ग्रीन लीव्हज’ रेस्टॉरंटला 385 रुपयांना मिळणारे पनीर बटर मसाला ॲपवर मागवले तर 519 रुपये म्हणजेच 134 रुपये अधिक लागतात. पनीर टिक्का मसाल्याचे रेस्टॉरंटचे दर 399 तर ऑनलाइनला 534 रुपये. शाही भोजमध्ये 410 रुपयांची थाळी ॲपवर 513 रुपयांपर्यंत मिळते. म्हणजेच ग्राहकांना 103 रुपयांचा भुर्दंड बसतो. ग्रेट सागर, सिल्व्हर स्पून, याल्ला-याल्ला,अमिगोज किचनमध्येही व्हेज जेवण ऑनलाइनच्या तुलनेत 25 ते 35 टक्क्यांनी स्वस्तच मिळते, असे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आले.
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:रेस्टॉरंटमध्ये 310 रुपयांत मिळणाऱ्या बिर्याणीला ऑनलाइन लागतात 380, सर्व्हिस चार्ज, जीएसटी देऊनही रेस्टॉरंटमध्ये 38% जेवण स्वस्त
