![]()
भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, ५ ते ६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. अडथळे पार करत बचावकार्य सुरू इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली एक चाळ जेसीबीच्या साहाय्याने तोडून बचाव पथकाने आत प्रवेश मिळवला. रिकामी केलेली इमारत अन् जीवघेणा मोह दुर्घटनाग्रस्त झालेल्या या इमारतीचे नाव कोहिनूर अपार्टमेंट असून ती २०१२ मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, बांधकाम कमकुवत असल्याने तिला महापालिकेने आधीच धोकादायक म्हणून जाहीर केले होते. गुरुवारी या इमारतीच्या एका विंगमधील तळमजल्यावरील खराब झालेल्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यादरम्यान इमारतीला तडे जाऊ लागले आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास इमारत एका बाजूला कललेली दिसली. धोका ओळखून महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस बंदोबस्तात पूर्ण इमारत रिकामी केली. तसेच, इमारतीचे वीज आणि पाणी कनेक्शनही तोडण्यात आले. मात्र, दुर्दैवाने काही रहिवासी घरातील आपले साहित्य काढण्यासाठी पुन्हा तळमजल्यावर गेले आणि बरोबर साडेअकराच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग त्यांच्या अंगावर कोसळला. ५ ते ६ जण अडकल्याची भीती एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर ढिगारा उपसण्याचे काम केले असून आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली ५ ते ६ जण अडकलेले असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. हेही वाचा पावसाचा धुमाकूळ:नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली. सविस्तर वाचा
भिवंडीत चार मजली इमारत कोसळली:3 जणांचा मृत्यू, 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू
