![]()
अहिल्यानगर शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरावरील भिंगार, नागरदेवळे अन् वडारवाडी परिसरात अचानक बिबट्याची डरकाळी कानावर आली. दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्यांची एन्ट्री झाल्याची माहिती पसरताच, शेकडो नागरिक घटनास्थळी धावले. वाढत्या गर्दीमुळे बिथरलेला बिबट्या या कंपाउंडवरून त्या कंपाउंडमध्ये लपण शोधत राहिला. अडीच तासांपेक्षा जास्तवेळ हा थरार सुरू होता. वनविभागाने जाळी लावून त्याला ताब्यात घेतले. तसेच ब्लो पाईपद्वारे त्याला भूल देऊन सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत केले. मागील ९० दिवसांत जेरबंद केलेला हा ३० वा बिबट्या आहे. सकाळची वेळ होती, साडेआठ-नऊच्या सुमारास नागरदेवळे भागात, स्वयंपाक खोलीत चहा घेत असतानाच, कंपाउंडवरून काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. लपण शोधण्यासाठी गुरगुरत बिबट्याने धूम ठोकली. माहिती वाऱ्यासारखी भिंगरसह परिसरात पसरली. त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी उसळली. वनविभाग, भिंगार पोलिसांच पथक घटनास्थळी दाखल झाले. भिंगार व नगर तालुका पोलिसांसह वनविभागाचे वनक्षेत्रपाल अविनाश तेलोरे, वनपाल नितीन गायकवाड, वनरक्षक विजय चेमटे, अशोक गाडेकर, मनेष जाधव, वनरक्षक अर्जुन खेडकर यांनी पिंजरा आणला परंतू, तेथे पिंजरालावण्यासारखी स्थिती नसल्याने हातात जाळे घेऊन बिबट्याचा पाठलाग सुरू झाला. दोन तास हा थरार सुरूच होता, बिबट्याच्यादहशतीने दारं बंद केली जात होती. शेवटी एकाजुन्या घराच्या बाथरूममध्ये बिबट्याने लपणशोधले. त्यावेळी जाळी लावून त्याला ताब्यातघेतले. त्याला बेशुद्ध करण्यासाठी ब्लो पाईपद्वारेभुलीचे इंजेक्शन दिले. दरम्यान, वनक्षेत्रपाल तेलोरेयांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्याआहेत. तसेच अफवा पसरवू नये असेही आवाहनकेले आहे. गन ऐवजी ब्लो पाईपचा वापर का? ज्यावेळी बिबट्या दूर अंतरावर असतो, त्यावेळीट्रँन्क्युलाईज गनद्वारे बिबट्याला बेशुद्ध केले जाते.पण बिबट्या जवळ होता. त्यामुळे ब्लो पाईपचावापर केला. या पाईपमध्ये भुलीचे इंजेक्शनलावण्यात आले. फूक मारल्यानंतर ते अचूकलागताच, बिबट्या बेशुद्ध होतो. तसेच या पद्धतीमुळेआवाज होत नसल्याने अधिक सोयीस्कर ठरते. गर्दी जास्त होती, पळापळ झाली बिबट्या एका कंपाउंडवरून दुसऱ्या कंपाउंडवरझेप घेत होता. त्यावेळी लोकांचीही मोठी गर्दी झालीहोती. लोकांनी दारं बंद केली. आमच्या जुन्यादुकानाजवळ बिबट्या आल्याचे समजले.बिबट्याच्या गुरगुराटाने भिती परसरली होती. एकाबंद टॉयलेटमध्ये बिबट्या गेल्यानंतर त्यांलावनविभागाने शिथापिने ताब्यात घेतले. -सचिनसुभाष पेंढूरकर , ग्रामस्थ. लोकवस्तीत २०० बिबटे पकडण्याची तयारी भिंगार परिसरात सोमवारी आढळून आलेला बिबट्या दिड वर्षांचा होता. त्याला जेरबंद करून सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत केले. मागील काही महिन्यात पकडलेले बिबटे सोडले नाहीत, ते रेस्क्यू सेंटरमध्ये स्थलांतराची परवानगी आपण मागत आहोत. पण अद्याप मिळाली नाही. त्याचबरोबर लोकवस्तीत आम्ही २०० बिबटे पकडण्यास तयार आहोत. तशी परवानगी मागितली ती देखील मिळाली नाही. – धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक धडका मारून बिबट्याने उघडले कंपाउंडचे गेट किचनमध्ये उभी होते त्यावेळी बिबट्याने कंपाउंडवरून काही तरी पडल्यासारखा आवाज झाला. हळूच दरवाजा उघडून पाहिले तर समोर बिबट्या होता. लगेच घाईने दरवाजा बंद केला. कंपाउंडच्या आत पळापळ करून त्याने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण जागा नसल्याने, त्याने गेटला जोरदार धडका दिला. त्यानंतर थोडा गॅप होताच, त्यातून बिबट्याने धूम ठोकली. मी बाहेर जाऊन लोकांना सावध केले. – मिना बोंदर्ड, गोरक्षनाथ बिबट्यांच्या स्थलांतरासाठी शासनस्तरावरून दुर्लक्ष मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून, मानवावर हल्ले होत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा वनविभागावर रोष वाढतो आहे. उपद्रवी बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहिम जिल्ह्यात राबवली, तसेच एक नरभक्षक ठार केला आहे. तसेच इतर हल्लेखोर जेरबंद केले. राज्यस्तरावरून रेस्क्यू सेंटर उभारण्याबाबत केंद्रापर्यंत प्रस्ताव पाठवले. पण पकडलेल्या सुमारे ५० बिबट्यांच्या स्थलांतराची परवानगी मिळवण्यात अद्याप यश आले नाही. त्यामुळे कमी जागेत अडचणीत, बिबट्यांना ठेवावे लागत आहे. मंत्रालय स्तरावरून जिल्ह्यातील चिंताजनक स्थितीकडे दुर्लक्ष होत आहे.
दाटलोकवस्तीत बिबट्याची डरकाळी, अडीच तास थरार:‘ब्लो’ पाईपद्वारे भूल, 90 दिवसांत 30 वा बिबट्या जेरबंद
