![]()
चणकापूर धरणातून रब्बीचे आवर्तनसोमवारी सोडण्यात आले. धरणाच्यापायथ्याशी असलेल्या चणकापूरगावाची यात्रा सुरू असल्याने वयात्रेकरूंनी प्रवाह मार्गात पार्किंगकेलेल्या दुचाकींभोवती पाणी जाऊनदोन दुचाकी वाहून बाजूला फेकल्यागेल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवानेयामध्ये कुठलीही जीवित वा वित्तहानीझाली नसल्याने संकट टळले. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळेनागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चणकापूर गावात सुरू असलेल्याचणकेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्तधरण परिसरात मोठी गर्दी झाली होती.यावेळी पाटबंधारे विभागाने रब्बीहंगामातील आवर्तन सोडण्यात येणारअसून नागरिकांनी अवैधरित्या पार्किंगकेलेली वाहने काढण्यासाठीवेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्रतरीही काही नागरिकांनी सूचनांकडेदुर्लक्ष केल्याने व पाणी सोडले तरीवाहनांपर्यंत येणार नाही, याविश्वासाने वाहने काढली नाहीत.म्हणून हा प्रसंग घडला. मात्र अचानकझालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्येभीतीचे वातावरण निर्माण झाले होते.काही वेळ परिसरात गोंधळ उडाला.स्थानिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळीधाव घेतली. वाहनांपर्यंत पाणी येणार नाही, या विश्वासाने वाहने तशीच उभी ठेवली चणकापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तनसोडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून सुचनाआल्याने पाणी सोडण्यात आले. यावेळी प्रवाहक्षेत्रात असलेल्या नागरिकांना अवैधरित्या पार्किंगकेलेली वाहने काढण्याच्या सूचना दिल्या. मात्रकाही नागरिकांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले व पाणीवाहनांपर्यंत येणार नाही या विश्वासाने प्रवाहातीलवाहने तशीच उभी ठेवली. यावेळी धरणातूनसुटलेल्या पाण्याच्या वेगात दोन दुचाकी वाहूनबाजूला पडल्या. यावेळी नागरिकांची गर्दी झाल्यानेगोंधळ निर्माण झाला. मात्र कुठलीही जीवित वावित्तहानी नाही. नागरिकांनी सहकार्य करावे. – अक्षय काळे, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग
चणकापूरमधून आवर्तन, पाण्यात अडकल्या यात्रेकरूंच्या दुचाकी:पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष
