काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे नातू शिखर पहारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या बॅनरबाजीचे समर्थन केले आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडले? एक दिवस असे केल्याने काय बिघडले, मी सुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटलो. याचवेळी त्यांनी स्वतःला आलेल्या ऑफरबाबत सांगताना स्पष्ट केले की, मला देखील अनेकवेळा इकडे (भाजपमध्ये) या असे म्हटले गेले, मात्र, मी म्हटले मी तिकडे (काँग्रेसमध्ये) आहे तर इकडे येऊन परत काय करणार. या संदर्भात बोलताना सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले की, परवा बातमी आली की माझ्या नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. एक दिवस असे केल्याने काय बिघडले, मी सुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटून आलो. यामुळे काहीही बिघडत नाही आणि आपली फिलॉसफी बदलत नाही. मला देखील अनेकवेळा इकडे (भाजपमध्ये) या असे म्हटले गेले. मात्र मी म्हटले मी तिकडे (कॉंग्रेस) आहे तर इकडे (भाजपमध्ये) येऊन परत काय करणार, असे शिंदे यांनी सांगितले. मी जिथे आहे तिथलेच काम करणार आहे. इकडे तुमच्यात ढवळाढवळ नको, असे म्हटल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकशाहीला काळिमा लागता कामा नये पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजपमध्ये गेलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे सुद्धा मी पाहिले आहे. 25 वर्षांपूर्वी सुद्धा असेच होत होते. त्यावेळी एकत्रित सगळेच पक्ष सोडून गेले. पुन्हा 4 ते 5 वर्षात गेलेले सगळे परतले. राजकारणात देखील चुका होत असतात. त्यामुळे पत्रकारांनी त्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे. नकळत एखाद्याकडून जर चूक झाली असेल तर ती समजून घेतली पाहिजे, आपली लोकशाही ही वर चढत जाणारी आहे, त्याला काळिमा लागता कामा नये, असे शिंदे यांनी म्हटले. ‘पंतप्रधान जितके माझ्याशी बोलतात तितकेच शरद पवारांशी बोलतात’ देशाचे पंतप्रधान हे जितके माझ्याशी बोलतात तितकेच ते शरद पवारांशीही बोलतात. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात, काय कोणी विचारात नाही. उद्घाटनाला वगैरे गेले तर काही बिघडत नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी पंतप्रधानांकडून होतात, वाईटही घडल्या जातात. मात्र पत्रकारांनी याचे विश्लेषण करून घेतले पाहिजे, असा सल्ला शिंदे यांनी पत्रकारांना दिला. तसेच पुढे त्यांनी सांगितले की, मध्यंतरी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, मी आवर्जून ते पुस्तक चालून बघितले. पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून हे सगळे महत्त्वाचे आहे. काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोलापुरात येऊन गेले, त्यांच्याविषयीही माहिती घेतली. त्यांचेही साहित्य मी वाचतो. कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास देखील किती मोठा आहे, अशी माहिती सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search