'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2024' जाहीर:सुनिता डागा, हिनाकौसर खान, सानिया यांच्यासह 32 साहित्यिकांचा गौरव




महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जाणारे ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०२४’ आज (१३ फेब्रुवारी २०२६) जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी विविध वाङ्मय प्रकारातील एकूण ३५ पुरस्कारांपैकी ३२ साहित्यिकांची निवड करण्यात आली असून, प्रौढ वाङ्मय प्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर बाल वाङ्मय आणि प्रथम प्रकाशन प्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सन २०२४ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांतून परीक्षण समितीने शिफारस केलेल्या नावांना शासनाने मान्यता दिली आहे. पुरस्काराचे स्वरूप आणि विभागणी प्रौढ वाङ्मय: एकूण २२ पुरस्कार (प्रत्येकी १ लाख रुपये). बाल वाङ्मय: एकूण ६ पुरस्कार (प्रत्येकी ५० हजार रुपये). प्रथम प्रकाशन: एकूण ६ पुरस्कार (प्रत्येकी ५० हजार रुपये). सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार: १ पुरस्कार (१ लाख रुपये). प्रमुख पुरस्कार विजेते (प्रौढ वाङ्मय) या विभागात कविता, नाटक, कादंबरीसह विविध प्रकारांचा समावेश आहे. काव्य (कवी केशवसुत पुरस्कार): सुनिता डागा (पुस्तकाचे नाव: तुझं शहर हजारो मैलांवर).्र नाटक/एकांकिका (राम गणेश गडकरी पुरस्कार): गणपत गायकवाड (रायगडावरून राजगृहाकडे). कादंबरी (हरी नारायण आपटे पुरस्कार): हिनाकौसर खान (इत्रनामा). ललितगद्य (अनंत काणेकर पुरस्कार): सानिया (काही आत्मिक.. काही सामाजिक). आत्मचरित्र (लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार): युनूस सय्यद (इनुची गोष्ट). समीक्षा (श्री. के. क्षीरसागर पुरस्कार): विनय नारकर (वस्त्रगाथा). इतिहास (शाहू महाराज पुरस्कार): मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (अपराजिता गाथा वीरांगनांची). संकीर्ण/क्रीडा (भाई माधवराव बागल पुरस्कार): भानू काळे (अंतर्नाद एका मासिकाचा उदयास्त) बाल वाङ्मय विभाग कविता (बालकवी पुरस्कार): अशोक कोतवाल (गाऊ आनंदाचे गाणे). कादंबरी (साने गुरुजी पुरस्कार): सुरेश वांदिले (१६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब…!). कथा (राजा मंगळवेढेकर पुरस्कार): जितेंद्र कुवर (चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी). प्रथम प्रकाशन विभाग काव्य (बहिणाबाई चौधरी पुरस्कार): सचिन शिंदे (पातीवरल्या बाया). कादंबरी (श्री. ना. पेंडसे पुरस्कार): अलका मोकाशी (गुंतवळ). ललितगद्य (ताराबाई शिंदे पुरस्कार): ऋतुराज कशेळकर (कलंदर बिलंदर). विशेष पुरस्कार सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार): बेळगाव येथील प्रा. डॉ. शुभदा शहा यांच्या ‘घाल घाल पिंगा वाऱ्या…’ या पुस्तकास जाहीर झाला आहे. काही पुरस्कारांसाठी शिफारस नाही यंदाच्या यादीत प्रौढ वाङ्मय विभागातील ‘राज्यशास्त्र/समाजशास्त्र’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार) आणि प्रथम प्रकाशन विभागातील ‘नाटक/एकांकिका’ (विजय तेंडूलकर पुरस्कार) या प्रकारांसाठी कोणत्याही पुस्तकाची शिफारस करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks