नांदेड पोलिस दलातील २ पोलीस उपनिरीक्षक, १ श्रेणीपोलीस उप निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त



नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिस दलातील 02 
 पोलीस उपनिरीक्षक  , 01  श्रेणी पोलीस उप निरीक्षक आणि 07 पोलीस अंमलदार असे एकूण 10 अधिकारी व अंमलदार 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस अधीक्षक नांदेड  अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड शहर  सुरज गुरव  यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सेवानिवृत्तांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवेतून योगदान अमूल्य असल्याचे सांगत त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला पोलिस विभागातील अधिकारी-अंमलदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडळवार यांनी केले. जळबाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक  श्यामसुंदर टाक यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
तसेच हनमत पोतदार, नरेंद्र राठोड,मारोती कांबळे, सविता भिमलवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांची नावे पुढीलप्रमाणे..

पोलीस उप निरीक्षकअशोक किशन बनसोडे – पो. स्टे. शिवाजीनगर,गौतम हनुमंतराव वाहूळे – वाचक  उप विभाग इतवारा,श्रेणी पोलीस उप निरीक्षक दिगंबर किशनराव डुडुळे – पो. स्टे. तामसा, पोलीस अंमलदार राजाराम रामराव सांगळे – पो. स्टे. शिवाजीनगर, शैलेंद्रसिंघ हुजुरसिंघ मान – पोलीस मुख्यालय नांदेड, शेषेराव रामधन चव्हाण – पो. स्टे. हदगाव, भास्कर व्यंकटराव मुंढे – मोटार परिवहन विभाग,गोविंद रामचंद्र साबळे – पो. स्टे. हिमायतनगर,देवराव शेषराव वडजे – पो.स्टे उमरी, संजय भुजंगराव कदम – मोटार परिवहन विभाग
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे दीर्घ सेवेमधील कार्य व योगदानाबद्दल पोलिस दलाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. 


Post Views: 410






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks