प्रा. प्रभु कोकणे यांचे देहदान


नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे तसेच ज्यानी दलित, मुस्लिम व अल्पसंख्यांक यांचे आरक्षण व संवैधानिक समस्या वर विपुल लिखाण व चळवळ केली आहे ज्येष्ठ समाजसेवक तथा प्राध्यापक कै. श्री. प्रभु नागगोंडा कोकणे (वय 85 वर्षे) यांचे सोमवार, दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.
प्रा. कोकणे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण मिळावे यासाठी व्यापक जनआंदोलन उभारले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्याला वाहून घेतले असून तन, मन आणि धनाने समाजासाठी कार्य केले. त्यांच्या निधनाने समाजातील एक मोठे नेतृत्व हरपले आहे.
त्यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. अ‍ॅड. प्रशांत कोकणे, प्रवीण कोकणे आणि प्रकाश कोकणे यांचे ते वडील होत.
त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी येथे करण्यात आला असून, अंतिम दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रम दिनांक 31 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता (फॉरेन्सिक मेडिसिन व टॉक्सिकोलॉजी विभाग)  येथे संपन्न झाला.
त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks