‘महात्मा फुले, प्रधानमंत्री आरोग्य योजना’ लागू:मनपाच्या 13 शहरी आरोग्य केंद्रात नागरिकांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार‎


.

महानगरपालिकेद्वारे संचालित सर्व १३ शहरी आरोग्य केंद्रांना महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आता महागडे उपचार मिळवण्यासाठी दूरच्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, तर शहरी आरोग्य केंद्रांमधूनच योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे.

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ रोजी आयोजित महत्त्वपूर्ण सभेमध्ये शहरवासीयांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला.या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकूण २३९९ आजारांवर पूर्णपणे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष एकत्रित ५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च शासनाकडून केला जातो. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे को-ब्रँडेड ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड’ असणे बंधनकारक आहे. हे कार्ड नसल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अद्याप गोल्डन कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधून कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गोल्डन कार्ड तयार करताना ई-केवायसी प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांचे रेशन कार्ड अद्ययावत व ई-केवायसी झालेले असणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड अपडेट असणे आणि आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. मोबाइलवर येणाऱ्या उर्वरित. पान ४ सभेमध्ये ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयवंदना योजना’ अंतर्गत स्वतंत्र लाभाची माहितीही देण्यात आली. या योजनेअंतर्गत ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्रपणे ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा लाभ उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, वयवंदना कार्ड तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घेता येईल. महापालिकेच्या आरोग्य विभागातील बैठकीत उपस्थित अधिकारी.

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *